Home Loan: होम लोन घ्यायचं आहे?, मग ‘या’ गोष्टी नक्की ध्यानात ठेवा

Home Loan | सामान्य व्यक्तींना घर खरेदी करताना एकरकमी पैसे देणे अवघड असते. त्यामुळे बहुतांश ग्राहक घरखरेदीसाठी गृहकर्ज घेतात. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज ग्राहकाचे उत्पन्न आणि परतफेड क्षमता पाहून कर्ज देते.

Home Loan: होम लोन घ्यायचं आहे?, मग 'या' गोष्टी नक्की ध्यानात ठेवा
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 8:14 AM

मुंबई: स्वत:च्या मालकीचं घर असणं, हे अनेकांच्या आयुष्यातील प्रमुख स्वप्न असतं. कोरोनामुळे गेल्या काही काळात गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी घट झाली आहे. गृहकर्जावरील व्याजदर सतत कमी होत आहे. एक एक करून सर्व बँका आणि वित्तीय संस्था गृहकर्जावरील व्याजदर कमी करत आहेत. त्यामुळे सध्या घरखरेदीसाठी चांगली संधी असल्याचे बोलले जाते.

सामान्य व्यक्तींना घर खरेदी करताना एकरकमी पैसे देणे अवघड असते. त्यामुळे बहुतांश ग्राहक घरखरेदीसाठी गृहकर्ज घेतात. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज ग्राहकाचे उत्पन्न आणि परतफेड क्षमता पाहून कर्ज देते. कर्जाशी संबंधित सर्व माहिती बँकांच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. कर्जाच्या पात्रतेचे निकष किंवा ईएमआय कॅल्क्युलेटर याद्वारे, ग्राहक कर्जासाठी पात्र आहे की नाही हे कळते.

गृहकर्ज घेण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या?

21 ते 65 वयोगटातील लोकांना गृहकर्ज उपलब्ध Dmls. कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांनी पगारातून कमाई केली पाहिजे किंवा ते स्वयंरोजगार करू शकतात. गृहकर्ज अर्जदाराचे किमान वेतन किंवा उत्पन्न दरमहा 25 रुपये असावे. गृहकर्जासाठी आवश्यक किमान क्रेडिट स्कोअर 750 आहे. कर्जाचा कालावधी 5 वर्षे ते 30 वर्षे असतो. कर्ज अर्जदाराची क्रेडिट हिस्टरी देखील क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. कर्ज देणाऱ्या बँका आणि NBFC चे नियम आणि अटी देखील भिन्न आहेत.

साधारणत: बँकांकडून घराच्या एकूण किंमतीच्या 80 टक्के गृहकर्ज दिले जाते. 20 टक्के रक्कम ही सुरुवातीला तुम्हाला भरावी लागते. गृहकर्जाचा हप्ता हा ग्राहकाच्या एकूण उत्पन्नाच्या 60 टक्क्यांपेक्षा कमी असला पाहिजे. ग्राहक अगदी दोन ते पाच लाखांचेही गृहकर्ज घेऊ शकतात.

प्लॉट लोन घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?

काहीजण प्लॉट खरेदी करुन त्यावर घर बांधतात. प्लॉट विकत घेण्यासाठी वेगळ्याप्रकारचे कर्ज मिळते. ही जमीन रहिवाशी मालमत्ता असल्याचे पुरावे दिल्यानंतरच तुम्हाला प्लॉट लोन दिले जाते. होम लोनप्रमाणे बहुतांशा बँका प्लॉट लोनही देतात. मात्र, त्यासाठी काही अटीशर्ती घालून देण्यात आल्या आहेत.

प्लॉट लोन देताना लोन टू व्हॅल्यू’ LTV रेश्यो पाहिला जातो. होम लोनमध्ये ग्राहकाला अगदी 90 टक्क्यांपर्यंतही कर्ज मिळते. कारण बँकेकडे त्याच्या घराची हमी असते. मात्र, प्लॉट लोनमध्ये तसा प्रकार नसल्याने बँकेकडून जोखीम कमी करण्यासाठी फक्त 65 ते 75 टक्केच कर्ज दिले जाते. प्लॉट खरेदीसाठी 40 लाखांची गरज असेल तर बँक तुम्हाला फक्त 26 ते 30 लाखांपर्यंत कर्ज देईल.

तसेच ग्रामीण भागातील प्लॉटसाठी कर्ज मिळत नाही. औद्योगिक क्षेत्रातील जमिनीसाठीही प्लॉट लोन मिळत नाही. तुम्ही प्लॉट लोन घेऊन त्या जमिनीवर शेती करु शकत नाही. तसेच त्या जमिनीवर कमर्शियल कन्स्ट्रक्शनही करता येणार नाही.

संबंधित बातम्या:

Budget 2021 : होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आणखी एक वर्ष व्याजावर दीड लाखांची अ‍ॅडिशनल सूट मिळणार

SBI ची धमाकेदार ऑफर, free मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा

Home Loan : कोटक महिंद्रा बँक देतेय सर्वात स्वस्त कर्ज? जाणून घ्या व्याजदर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.