Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC IPO news: एलआयसी विमाधारकांना बंटर लॉटरी? आयपीओमध्ये किती मिळणार सूट, आज कळणार माहिती

सर्व गुंतवणुकदार एलआयसीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्वसामान्यांचा सहभाग वाढावा अशी सरकारची इच्छा आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य गुंतवणुकदारांना स्वस्तात शेअर्स देण्याची एलआयसीने तयारी सुरू केली आहे.

LIC IPO news: एलआयसी विमाधारकांना बंटर लॉटरी? आयपीओमध्ये किती मिळणार सूट, आज कळणार माहिती
LIC IPOImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 2:44 PM

देशातील सर्वसामान्य गुंतवणुकदारांना एलआयसीत गुंतवणुकीची संधी लवकरच मिळणार आहे. त्यात एलआयसीच्या ग्राहकांना बंपर लॉटरी लागणार आहे.सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या (Life Insurance Corporation) प्रस्तावित आयपीओसाठी (Initial Public Offer) आज मोठा दिवस आहे.एलआयसी आपल्या पॉलिसीधारकांना पाच टक्क्यांपर्यंत सूट देऊ शकते आणि त्यांच्यासाठी इश्यूमध्ये 10 टक्के हिस्सा राखून ठेवू शकते. सर्व सामान्य गुंतवणुकदारांना स्वस्तात शेअर्स देण्याची तयारी आहे. पॉलिसीधारकांना आयपीओतील समभाग खरेदी करण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. लवकरच सरकार या अटी जाहीर करणार आहे. देशातील सर्वात मोठ्या आयपीओला मंजुरी देण्यासंबंधी एलआयसीच्या संचालक मंडळाची(LIC Board of Director) आज बैठक होणार आहे. बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच कंपनी आयपीओसाठी (IPO) रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) हा मसुदा दाखल करणार आहे.

सवलतीचा निर्णय होणार

या बैठकीत एलआयसीच्या विमाधारकांना (policyholders) आयपीओमध्ये किती सवलत मिळेल, याचाही निर्णय होऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. म्हणजे त्यांना शेअर्स किती स्वस्तात मिळतील. दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की विमा नियामकाने एलआयसीच्या यादीसाठी मंजुरी दिली आहे आणि लवकरच यासंदर्भात औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.

किती मिळणार सूट?

एलआयसी आपल्या विमाधारकांना पाच टक्क्यांपर्यंत सूट देऊ शकते आणि त्यांच्यासाठी इश्यूमध्ये 10 टक्के हिस्सा राखून ठेवू शकते. या व्यवहारातून सरकार एलआयसीमधील आपला पाच ते दहा टक्के हिस्सा विकू शकते, पण ही सर्व प्रक्रिया मूल्यांकनावर अवलंबून असेल. एलआयसी इश्यूसाठी DRHP या आठवड्यात दाखल करण्यात येईल, असे गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या (DIPAM) सचिवांनी सांगितलेले आहे.

ही संधी सोडू नका

एलआयसीचे देशात लाखो विमाधारक असून त्यांना या आयपीओमध्ये स्वस्तात शेअर्स मिळवण्याची उत्तम संधी आहे. एवढेच नव्हे तर एक भाग कर्मचाऱ्यांसाठी राखीवही ठेवला जाणार आहे. एलआयसीच्या आयपीओची सर्वच गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यात सामान्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याची सरकारची इच्छा आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य गुंतवणु कदारांना स्वस्तात शेअर्स देण्याची तयारी आहे. मात्र विमाधारकांना या आयपीओतील समभाग खरेदी करण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. लवकरच सरकार या अटी जाहीर करणार आहे.

ठळक मुद्दे

एलआयसीच्या आयपीओसाठी आज मोठा दिवस एलआयसी बोर्डाची आज होणार महत्त्वपूर्ण बैठक पॉलिसीधारकांना 5 टक्के सूट मिळू शकते ते 10% हिस्सा राखून ठेवू शकतात

इतर बातम्या-

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी

Video: मराठी पोरं ह्या गुजराती पोराचा आदर्श घेतील का? चहा विकता विकता कोट्याधीश झालेल्या तरुणाला ऐकाच

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....