पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवा पैसे बँकेपेक्षा मिळेल अधिक परतावा

बऱ्याचवेळा आपण गुंतवणुकीसाठी बँकेच्या मुदत ठेव योजनेची निवड करतो, या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला दर महिन्याला व्याज मिळत राहाते. मात्र पोस्टाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये पैसे गुंतवल्यास तुलनेने आपल्याला अधिक फायदा होऊ शकतो.

पोस्टाच्या 'या' योजनेमध्ये गुंतवा पैसे बँकेपेक्षा मिळेल अधिक परतावा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 6:45 AM

नवी दिल्ली : बऱ्याचवेळा आपण गुंतवणुकीसाठी बँकेच्या मुदत ठेव योजनेची निवड करतो, या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला दर महिन्याला व्याज मिळत राहाते. तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर एक ठराविक रक्कम देखील मिळते. या योजनेतून बऱ्यापैकी परतावा मिळत असल्याने अनेक जण एफडी करतात. विशेष: ज्यांनी निवृत्ती घेतली आहे, असे लोक त्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांची एफडी करतात. एफडीच्या व्याजातून त्यांचा घरखर्च चालतो. मात्र आता कोरोनाच्या काळात अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याज दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे या योजनेतून मिळणार परतावा देखील आता कमी झाला आहे. त्या तुलनेमध्ये पोस्टाच्या अशा अनेक स्कीम आहेत ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. आज आपण अशाच एका योजनेबद्दल जाणून घेऊयात.

पोस्टामधील मुदत ठेव योजना

बँकेप्रमाणेच पोस्टामध्ये देखील मुदत ठेव योजना एफडी असते. ज्यामध्ये तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. बँकेमधील एफडीवर तुम्हाला जास्तीत जास्त 5.5 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. मात्र हेच पैसे तुम्ही पोस्टामध्ये गुंतवल्यास तुम्हाला 6.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. तुम्ही पोस्टाच्या या योजनेमध्ये एक हजार रुपयांपासून पुढे कितीही रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवू शकतात. मुदत ठेव योजनेमध्ये पैसे गुंतवायाला कोणतीही मर्यादा नसते. तुम्ही ठेवलेल्या रकमेवर तुम्हाला 6.7 टक्के वार्षिक दराप्रमाणे व्याज मिळते. सोबतच तुमच्या एफडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या योजनेचा कालावधी देखील वाढू शकता.

इनकम टॅक्समध्ये सूट 

इनकम टॅक्स ऍक्ट 1961 अनुसार तुम्ही जर पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत पाच वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला इनकम टॅक्समध्ये देखील सूट मिळते. त्यामुळे पैशांची आणखी बचत होते. याचप्रमाणे पोस्टाची आणखी एक योजना आहे, ज्या योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम तुमच्या पोस्टाच्या खात्यामध्ये जमा करू शकता. या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तिचा चांगला परतावा मिळतो. हेच पैसे तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरू शकतात.

संबंधित बातम्या 

PF Update | खुशखबरः पीएफ खात्यात व्याज जमा; ‘असा’ चेक करा तुमचा बॅलन्स

क्रिप्टो करन्सींच्या दरामध्ये घसरण, ‘असे’ आहेत नवीन दर

900 कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी काढले कंपनीतून, झुमवर सांगितले आज तुमचा शेवटचा दिवस

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.