Income Tax Return | आयटी रिटर्न भरण्याचा वेग सुसाट, 5 कोटींपेक्षा अधिक आयटीआर दाखल! अंतिम मुदत संपायला एक दिवसांचा अवधी!
आयटी रिटर्न भरण्याची तारीख एक दिवसांवर येऊन ठेपली आहे. बुधवारपर्यंत आयटी रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईटवर एकच झुंबड उडाली. तब्बल 5 कोटींहून अधिक आयटी रिटर्न दाखल करण्यात आले आहे. तर पोर्टल क्रॅश होत असल्याची ओरड ही ट्विटरवर दिसून आली. करदात्यांनी आयटी रिटर्न कालावधी वाढविण्याची विनंती केली आहे.
मुंबई : आयटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत जवळ येताच आयटी रिटर्न भरण्याचा वेग वायुगतीने वाढला आहे. आयकर खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 202-21 साठी आतापर्यंत 5 कोटींहून अधिक आयटी रिटर्न दाखल झाले आहेत. ट्वीट करुन आयकर खात्याने याविषयीची माहिती दिली. बुधवारी(दि.29) सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत हा आकडा पाच कोटींच्या वर गेला होता. रिटर्न जमा करण्याची अंतिम तारीख जवळ येताच हा वेग वाढला. आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आयटीआर ( ITR ) जमा करणा-या करदात्यांना दिलासा दिला. रिटर्नची ई-सत्यापन प्रत दाखल करण्यासाठी करदात्यांना 28 फेब्रवारी 2022 रोजी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
आयटी रिटर्न न भरल्यास काय होईल नुकसान
जर तुम्ही अद्यापही आयटी रिटर्न भरला नसेल तर सहाजिकच अंतिम मुदत उलटल्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असेल तर त्यासाठी एक हजारांचे विलंब शुल्क जमा करावे लागेल. जर 5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर 10 हजारांपर्यंत विलंब शुल्क अदा करावे लागेल. तुमच्याकडे कर थकला असेल आणि तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत आयटी रिटर्न भरला नसेल तर एक दिवसांचा विलंब तुम्हाला भुर्दंड बसवेल. त्यासाठी तुम्हाला पूर्ण एक महिन्याचा एक टक्के दराने व्याजाचा भरणा करावा लागेल. जर तुमचा कर अधिक कपात करण्यात आला असेल तर रिफंड रक्कम मिळण्यासाठीही विलंब होईल.
करदाते मार्च 2022 पर्यंत रिव्हाईज अथवा बिलंब कर भरु शकता. जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत रिटर्न जमा केला नाही तर तुम्हाला विलंब शुल्कासह मार्च 2022 पर्यंत रिटर्न जमा करता येईल. मार्च 2022 ही मुदतही तुम्ही ओलांडली तर तुम्हाला आयटी रिटर्न भरण्याची कुठलीच संधी देण्यात येणार नाही. आयकर कायद्याच्या 142 कलमान्वये तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळेल. यामध्ये 10 हजारांचा दंड आणि सहा महिने ते एक वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. जर थकीत कर 25 लाख असेल तर 7 वर्षांकरिता तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
दीड लाख कोटींचा रिफंड
कापला गेलेला कर परताव्याचे प्रमाण दीड लाख कोटी रुपये आहे. आयकर विभागाने चालु आर्थिक वर्षात आतापर्यंत 1.45 कोटी करदात्यांना 1.49 लाख कोटींचा कर परत केला आहे. आयकर विभागाने नुकतीच ही माहिती दिली. ट्वीटर अकाऊंटवरुन आयकर खात्याने याविषयीचे ट्वीट केले. 31 मार्च 2021 ते अंतिम मुदत संपण्यापूर्वी 21,021 कोटी रुपयांत आताचे 1.07 कोटींचा परतावा गृहीत धरण्यात आला आहे. आयकर खात्याच्या माहितीनुसार, 27 डिसेंबरपर्यंत आर्थिक वर्ष 20-21 साठी 4.67 कोटींपेक्षा अधिक आयकर रिटर्न दाखल करण्यात आले. त्यात 1.42 कोटी करदात्यांना 50,793 कोटींचा आयकर परतावा देण्यात आला. तर 2.19 लाख प्रकरणात 98,504 कोटींचा कोर्पोरेट कर परत करण्यात आला. एप्रिल 2021 ते 27 डिसेंबर 21 अतंर्गत 1.45 कोटी करदात्यांना 1,49,297 कोटींचा कर पतावा देण्यात आला.
हेही वाचा :
Mutual Fund | म्युच्युअल फंड: महिन्याला हजार गुंतवा, 20 वर्षांत लखपती व्हा!
ओमायक्रॉनने बँकांना धडकी, कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता, बँक NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज