Income Tax: तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई

Gold in Home | गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ज्याप्रकारे परदेशातून सोने आणण्यावर मर्यादा आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडे किती सोनं असावं, यावरही आहेत.

Income Tax: तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? काय आहे नियम; उल्लंघन झाल्यास आयकर विभागाची कारवाई
सोन्याचा दर
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 10:23 AM

मुंबई: भारतीयांना सोन्याविषयी असणारे आकर्षण ही काही नवी बाब नाही. आजही अनेकजण सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला (Gold) प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचा दर हा गगनाला भिडल्याने या धातूला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अजूनही लोक मोठ्याप्रमाणावर सोने खरेदी करताना दिसतात. (How much gold or jewellery any citizen can hold in India)

मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ज्याप्रकारे परदेशातून सोने आणण्यावर मर्यादा आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडे किती सोनं असावं, यावरही आहेत.

घरात किती सोनं साठवू शकता?

घरात सोनं साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही कायदेशीर मार्गाने सोनं खरेदी केलं असेल आणि त्याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर घरात कितीही सोनं साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT) माहितीनुसार, तुम्ही घरी सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकता. मात्र, आयकर विभागाकडून घरात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याची तपासणी होऊ शकते. तुमच्या घरात 50 लाख रुपयापेक्षा जास्त किंमतीचे दागिने असतील तर इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ते नमूद करावे लागते.

आयकर विभागाने याबाबत आणखी काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार लग्न झालेल्या स्त्रीला घरात 500 ग्रॅम दागिने ठेवण्याची मुभा आहे. तर अविवाहीत स्त्री घरात 250 ग्रॅम तर पुरुषांना घरात 100 ग्रॅम सोने बाळगण्याची मुभा आहे. या सोन्याच्या विक्रीवर भांडवली कर भरावा लागतो.

…तर घरातील सोनं जप्त होईल

प्राप्तिकर अधिनियम 1961च्या कलम 132 नुसार तपासादरम्यान जर संबंधित व्यक्ती सापडलेल्या कोणत्याही मूल्यवान वस्तूला किंवा दागिन्याच्या संदर्भात योग्य माहिती देऊ न शकल्यास किंवा उत्पन्नाचे योग्य स्त्रोत दाखवू न शकल्यास प्राप्तिकर अधिकारी जप्त त्या वस्तू जप्त करू शकतात. प्राप्तिकराशी निगडीत कोणत्याही प्रकरणात जर संबंधित व्यक्तीने मागील वर्षी भरलेला प्राप्तिकर हा विकत घेतलेल्या सोन्याच्या किंमतीशी मेळ खात नसल्यास प्राप्तिकर अधिकारी सोन्याचे दागिने किंवा मूल्यवान वस्तू यांना जप्त करू शकतात. पण एका विशिष्ट मर्यादेच्या खाली आयकर विभागही सोन्याचे दागिने जप्त करु शकत नाही.

संबंधित बातम्या:

घरात पडून असलेलं सोनं बँकेत ठेवून पैसे कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे योजना?

आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

देव पावला, सोनं खणखणीत घसरलं; जाणून घ्या नाशिक सराफातले भाव!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.