Corona Vaccine: कोरोनाची लस घ्या आणि स्वस्तात विमान प्रवास करा; जाणून घ्या सर्वकाही

Covid vaccine | इंडिगोच्या या योजनेचे नाव Vaxi Fare असे आहे. या योजनेतंर्गत लसीकरण झालेल्या व्यक्तीला कोणत्याही मार्गावरील विमान प्रवासाच्या शुल्कात 10 टक्के सवलत मिळणार आहे.

Corona Vaccine: कोरोनाची लस घ्या आणि स्वस्तात विमान प्रवास करा; जाणून घ्या सर्वकाही
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांतून सूट
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 12:12 PM

नवी दिल्ली: देशातील कोरोना लसीकरण मोहिमेने आता चांगलाच वेग पकडला आहे. सोमवारी एका दिवसात देशभरात 80 लाख लोकांना लस देण्यात आली होती. याच गतीने गेल्यास डिसेंबर महिन्यात जवळपास संपूर्ण देशाचे लसीकरण (Vaccination) होऊ शकते. नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काही कंपन्यांनीही पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाईन्सने आपल्या प्रवाशांसाठी एक खास योजना सुरु केली आहे. (Indigo Airlines offers 10% discount on fares for vaccinated peoples)

इंडिगोच्या या योजनेचे नाव Vaxi Fare असे आहे. या योजनेतंर्गत लसीकरण झालेल्या व्यक्तीला कोणत्याही मार्गावरील विमान प्रवासाच्या शुल्कात 10 टक्के सवलत मिळणार आहे. इंडिगोने आपल्या संकेतस्थळावर Vaxi Fare संदर्भात माहिती दिली आहे. लसीचा एक डोसही घेतलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी विमानतळावर चेक इन करताना प्रवाशांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल. कोणीही या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रवाशाकडून दंड आकारला जाईल, असे इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

McDonals’s कडून 20 टक्के डिस्काऊंट

तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या McDonals’s कडून उत्तर आणि पूर्व भारतात ‘We Care’ अभियान सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाची लस घेतलेल्या लोकांना 500 रुपयांच्या ऑर्डरवर 20 टक्के सूट दिली जात आहे. त्यासाठी ग्राहकांना आपले लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागत आहे.

सेंट्रल बँकेत जास्त व्याजदर

कोरोनाची लस घेतलेल्या व्यक्तींना सेंट्रल बँकेत ठेवीवर जास्त व्याजदर दिला जात आहे. त्यासाठी गेल्या महिन्यापासून ‘इम्यून इंडिया डिपॉजिट स्कीम’ (Immune India Deposit Scheme) सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 1111 दिवसांच्या ठेवीसाठी 5.35 टक्के इतके व्याज दिले जात आहे. इतर ग्राहकांसाठी हाच व्याजदर 5.10 टक्के इतका आहे. ही योजना 31 डिसेंबरपर्यंत सुरु राहील.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग काही दिवस घट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत आठ हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 50 हजार 848 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 358 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

इतर बातम्या:

कोरोनाची लस घेतल्यावर रेस्टॉरंटस, McDonals’s मध्ये डिस्काऊंट, बँकेत जास्त व्याजदर, जाणून घ्या सर्वकाही

वैष्णोदेवीचा फोटो असलेली नाणी करु शकतात तगडी कमाई, एका नाण्याच्या बदल्यात मिळतील 10 लाख रुपये

आरोग्य यंत्रणेनं करुन दाखवलं, दिवसभरात 80 लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम

(Indigo Airlines offers 10% discount on fares for vaccinated peoples)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.