जिओने या प्लॅनचे दर आधी वाढले, आता 200 रुपयांनी कमी केले, ग्राहकांना मिळणार असे फायदे
Reliance Jio 999 Plan: Jio ने या प्लॅनला 'Hero 5G' प्लॅन नाव दिले आहे. या प्लॅनमध्ये रोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. Airtel चा 979 रुपयांच्या प्लॅन जिओपेक्षा कमी नाही. या प्लॅनमध्ये जिओमधील फायदे मिळतात. तसेच 56 दिवसांसाठी Amazon Prime ची मेंबरशिप मोफत मिळते.
Reliance Jio 999 Plan: सर्व मोबाईल कंपन्यांनी आपल्या विविध प्लॅनचे दर वाढले. त्यात जिओने आपले सर्वच प्लॅन महाग केले आहेत. त्यामुळे मोबाईल ग्राहक नाराज झाले. काही जणांनी स्वस्त प्लॅन असणाऱ्या बीएसएनएलची वाट धरली. परंतु आता जिओ यूजरसाठी चांगली बातमी आहे. जिओने आपल्या एका प्लॅनचे दर कमी केले आहे. आता जिओचा 999 रुपये किंमतीचा प्रीपेड परत आला आहे. 3 जुलै 2024 रोजी या प्लॅनची किंमत 1,199 रुपये करण्यात आली होती. आता त्यात 200 कपात करुन 999 रुपये करण्यात आली आहे. तसेच आणखी इतरही फायदे या प्लॅनमध्ये दिले आहेत.
जिओने प्लॅनची व्हॅलिडिटी वाढवली
जिओने हा प्लॅन रिलॉन्च करताना ग्राहकांना आणखी काही फायदे दिले आहेत. या प्लॅनली मुदत पूर्वी 84 दिवस होती. परंतु आता ती 98 दिवस करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना आता 14 दिवस जास्त व्हॅलिडीटी मिळणार आहे. परंतु पूर्वीपेक्षा डाटा कमी मिळणार आहे. या प्लॅनमध्ये पूर्वी 3GB डाटा मिळत होता. तो आता 2GB मिळणार आहे. एकूण या प्लॅनमध्ये 192GB डाटा मिळणार आहे. तो पूर्वी 252GB मिळत होता.
हा फायदा कायम असणार
जिओच्या 999 रुपये प्लॅनचा डाटा कमी झाला तरी इतर फायदे मिळणार आहे. 999 रुपये प्लॅनमध्ये 5G डाटा अनलिमिटेड मिळणार आहे. तुम्ही 5G सर्व्हीस असणाऱ्या भागात राहत असल्यास अनलिमिटेड 5G डाटाचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे ग्राहक या प्लॅनला पसंती देत आहेत.
100 SMS आणि अनलिमिटेड कॉल
Jio ने या प्लॅनला ‘Hero 5G’ प्लॅन नाव दिले आहे. या प्लॅनमध्ये रोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. Airtel चा 979 रुपयांच्या प्लॅन जिओपेक्षा कमी नाही. या प्लॅनमध्ये जिओमधील फायदे मिळतात. तसेच 56 दिवसांसाठी Amazon Prime ची मेंबरशिप मोफत मिळते. त्यामुळे ग्राहकांना हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे.