जाणून घ्या सर्वाधिक स्वस्त गोल्ड लोन कोणत्या बँकेत मिळतेय?

Gold loan | अडीअडचणीच्या प्रसंगात घरात सोने असल्यास ते गहाण ठेवून कर्ज घेणे हा खूप मोठा आधार ठरू शकतो. तुम्हाला तातडीने पैसे हवे असल्यास सोने तारण कर्जासारखा पर्याय नाही. हे कर्ज मिळवण्यासाठी इतर कर्जांच्या तुलनेत कमी प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

जाणून घ्या सर्वाधिक स्वस्त गोल्ड लोन कोणत्या बँकेत मिळतेय?
गोल्ड लोन
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 9:07 AM

मुंबई: कोरोना संकटामुळे सध्या अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. नोकरी नसल्यामुळे अनेकांना दैनंदिन खर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. बँकांच्या अटी-शर्तींमुळे सामान्य लोकांना पटकन कर्ज मिळत नाही. त्यामुळे अनेकजण घरातील सोने गहाण (Gold loans) ठेऊन पैसे कर्जाऊ घेत आहेत.

सध्या बँकांशिवाय इतर काही संस्थाही सोने तारण ठेवून कर्ज देतात. एसबीआय गोल्ड आणि मुथूट फायनान्स सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या आघाडीच्या संस्था आहेत. मात्र, सोने तारण कर्जावरील व्याजही जास्त असते. त्यामुळे ग्राहक कायम कमी व्याजदर आकारणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतात.

कोणत्या बँकेत किती टक्के व्याजदर?

मण्णपुरम फायनान्स- 29 टक्के मुथुट फायनान्स- 24 ते 26 टक्के पंजाब अँण्ड सिंध बँक- 7 टक्के एक्सिस बँक- 13 टक्के इंडियन बँक- 7.50 टक्के युनियन बँक- 8.20 टक्के एसबीआय बँक- 7 ते 7.5 टक्के युको बँक- 8.50 टक्के पंजाब नॅशनल बँक- 8.75 टक्के आयसीआयसीआय बँक- 7.4 टक्के एचडीएफसी बँक- 8.9 टक्के ते 17.23 टक्के कॅनरा बँक- 7.35 टक्के

सोने तारण ठेवून कर्ज घेण्याचे फायदे

अडीअडचणीच्या प्रसंगात घरात सोने असल्यास ते गहाण ठेवून कर्ज घेणे हा खूप मोठा आधार ठरू शकतो. तुम्हाला तातडीने पैसे हवे असल्यास सोने तारण कर्जासारखा पर्याय नाही. हे कर्ज मिळवण्यासाठी इतर कर्जांच्या तुलनेत कमी प्रमाणात कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याच्या शुद्धतेवर आणि बाजार मूल्यानुसार कर्जाची रक्कम ठरते. सोन्याचे दागिने 18 कॅरेटपेक्षा जास्तीचे असतील तरच त्यावर कर्ज मिळते. हे कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नसते. तसेच कर्जाच्या पैशांचा वापर कशासाठी करणार, हे सांगणेही बंधनकारक नसते.

सोने तारण ठेवून कर्ज घेताना काय काळजी घ्याल?

सोने तारण ठेवून कर्ज घेताना संबंधित बँक आणि वित्तीय संस्थेकडून आकारण्यात येणाऱ्या व्याजदाराची माहिती घ्यावी. बँक कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस आकारत नाही ना, याची खातरजमा करुन घ्यावी. याशिवाय, प्री-पेमेंट, प्रोसेसिंग फी, री-पेमेंट चार्ज हा सगळा तपशील तपासून घ्यावा.

किती कर्ज मिळते?

तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांवर किती कर्ज द्यायचे याचे नियम प्रत्येक बँकेत वेगवेगळे असतात. एसबीआयकडून 20 हजारापासून 20 लाखांपर्यंत सोने तारण कर्ज दिले जाते. मुथुट फायनान्सकडून किमान 1500 रुपयांपासून कोणत्याही रक्कमेचे कर्ज दिले जाते. सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेच्या शाखेत जावे लागते. त्याठिकाणी तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर काही कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तुम्हाला सोने दिले जाते. सोन्याच्या किंमतीनुसार तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरते.

संबंधित बातम्या:

चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या आयातीत 3.3 टक्के घट, व्यापार तूट कमी करण्यास मदत

Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.