LIC प्लॅन | महिलांच्या स्वाबलंबनाची ‘आधारशीला’: 29 रुपयांची बचत, 3 लाखांची मॅच्युरिटी!

महिलांसाठी गुंतवणुकीचे क्षेत्र मर्यादित मानले जाते. भिशी किंवा परंपरागत आर्थिक गुंतवणूक पर्यायांच्या पलीकडे महिलांची झेप जात नाही. एलआयसी सारख्या गुंतवणूक माध्यमातून एकाधिक पर्याय महिलांसाठी उपलब्ध होतात.

LIC प्लॅन | महिलांच्या स्वाबलंबनाची ‘आधारशीला’: 29 रुपयांची बचत, 3 लाखांची मॅच्युरिटी!
Insurance Policy
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 9:21 PM

नवी दिल्ली : महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) ‘आधारशिला’ योजना सादर केली आहे. वुमेन स्पेशल योजनेत 8 ते 55 वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. छोट्या गुंतवणुकीतून भरघोस परतावा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. नियमित केवळ 29 रुपयांच्या बचतीमधून 3.97 लाखापर्यंत पैसे मॅच्युरिटीवेळी मिळू शकतात. (Lic Aadhaar Shila). एलआयसीच्या पॉलिसीद्वारे संरक्षणासह सर्वोत्तम कव्हरेज मिळते. व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास कुटुंबाला आर्थिक मदतही दिली जाते. यामध्ये किमान विमा रक्कम 75,000 रुपये आणि कमाल 3,00,000 रुपये आहे. पॉलिसीची मुदत 10 ते 20 वर्षे आहे. एलआयसीची आधारशिला खास महिलांसाठीची पॉलिसी आहे. यूआयडीएआयने आधार कार्ड जारी केलेल्या महिलांसाठी सर्वोत्तम हमी परताव्याच्या योजना आखली आहे. तुम्हाला मॅच्युरिटीवेळी बोनस (Maturity Bonus) सुविधेचा लाभ घेता येईल.

बचतीसोबत संरक्षणाची सुविधा एकाचवेळी योजनेतून उपलब्ध होईल. तुम्हाला योजनेत गुंतवणुकीसाठी एलआयसी शाखा किंवा एजंटशी संपर्क साधता येईल.

मॅच्युरिटीवर नेमका लाभ?

उदाहरणासह योजनेची मॅच्युरिटी आकडेमोड समजून घेऊया- समजा एखाद्या विमाधारक महिलेने वयाच्या 31 व्या वर्षी पॉलिसी घेतली आणि नियमित 20 वर्षांसाठी 29 रुपयांची बचतीद्वारेपहिल्या वर्षाचे प्रीमियम 4.5% करासह 10,959 रुपये असेल. तर पुढील प्रीमियम 2.25 टक्क्यांसह 10,723 रुपये होईल. तुम्हाला एकूण 214696 रुपये जमा होतील. तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर प्रीमियम अदा करू शकता. तुम्हाला पॉलिसीच्या 20 वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 3.97 लाख रुपये मिळतील. पॉलिसीचे हफ्ते मासिक, तिमाही किंवा सहामाही पद्धतीने अदा करता येतील. वेळेवर हफ्ता अदा केल्यास हफ्ता भरण्यासाठी सूटही प्रदान केली जाते.

निर्णय बदल्यास काय?

पॉलिसी घेतल्यानंतर विमाधारकाचा निर्णय बदलल्यास रद्द करण्याची मुभा एलआयसीने उपलब्ध केली आहे. एलआयसीद्वारे ही विशेष सुविधा प्रदान केली जाते. तुम्ही खास या योजनेअंतर्गत 15 दिवसांच्या आत पॉलिसी रद्द करू शकता.

..म्हणून, हवी महिलांची गुंतवणूक!

महिलांसाठी गुंतवणुकीचे क्षेत्र मर्यादित मानले जाते. भिशी किंवा परंपरागत आर्थिक गुंतवणूक पर्यायांच्या पलीकडे महिलांची झेप जात नाही. एलआयसी सारख्या गुंतवणूक माध्यमातून एकाधिक पर्याय महिलांसाठी उपलब्ध होतात. आर्थिक स्वावलंबनचा नवा मार्ग एलआयसीने महिलांना उपलब्ध करुन दिला आहे.

संबंंधित बातम्या :

LIC IPO : या आर्थिक वर्षातच एलआयसीचा आयपीओ, युद्धपातळीवर सर्व प्रकारच्या प्रक्रिया सुरू

LIC स्वस्तात मस्त पॉलिसी : 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे

आरोग्य विमा काढताना काय काळजी घ्यावी?, जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बाबी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.