Gold Rate: सोन्याच्या भावात पडझड, चांदी गडगडली; जाणून घ्या मुंबईसह देशातील आजचे भाव
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील सोने बाजार देशात प्रसिद्ध आहेत. कोलकातामध्ये सोन्याची किंमत 48,450 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचली आहे. तर चांदीची प्रति किलो 61,000 रुपये प्रति किलोग्रॅम भावाने विक्री करण्यात आली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सोन्याला प्रति 10 ग्रॅम 48,450 रुपये भाव मिळाला. तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 60,435 रुपयांवर पोहोचला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत पडछड दिसून आली. राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात 284 रुपयांची घसरण नोंदविली गेली. आज (गुरुवारी) दिल्लीत प्रति ग्रॅम 10 सोन्याच्या भाव 46,700 रुपयांवर पोहोचला. चांदीचे भाव देखील गडगडले असून 1,292 रुपयांच्या घसरणीसह प्रति किलो 59,590 वर पोहोचले आहेत.
एचडीएफसी सिक्युरिटीज नुसार, आंतरराष्ट्रीय बाजारतही मौल्यवान धातूंच्या किंमतीच घसरण दिसून आली आहे. काल (बुधवारी) 46,984 रुपयांवर 10 ग्रॅम सोन्याचे भाव पोहोचले होते. तर प्रति किलो चांदीला 60,882 रुपयांचा भाव मिळाला होता.
आंतरराष्ट्रीय पडछड
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,800 डॉलर प्रति औंस वर ट्रेडिंग करत आहे. तर चांदी 22.34 डॉलर प्रति औंस स्थिर आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ सल्लागार तपन पटेल यांनी सोने किंमती घसरणीसह कॉमेक्स ट्रेडिंग वर स्पॉट गोल्ड किंमतीवर ट्रेड करत असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अर्थघडामोडींचे थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर जाणवत असल्याचे नमूद केले आहे.
सोने-चांदीचे भाव दृष्टीक्षेपात
• दिल्ली- सोने (46,700), चांदी(59,590) • मुंबई- सोने(48,450), चांदी(60,453) • कोलकाता-सोने(48,450), चांदी(61,000)
फ्यूचर्स ट्रेडच्या किंमती
फ्यूचर्स ट्रेडमध्ये सोन्याच्या किंमती गुरुवारी 435 रुपयांनी घसरुन 47, 586 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचल्या आहेत. मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर फेब्रुवारी डिलिव्हरी काँट्रॅक्ट्स 435 रुपये किंवा 0.91 टक्क्यांच्या वाढीसह 47,586 रुपये प्रति 10 ग्रॅम वर ट्रेडिंग करत आहे. फ्यूचर्स ट्रेडमध्ये चांदीच्या किंमती 1,714 रुपयांच्या घसरणीसह 60,524 रुपये किलोग्रॅम वर पोहोचले आहे.
मुंबई आणि कोलकाता भाव
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील सोने बाजार देशात प्रसिद्ध आहेत. कोलकातामध्ये सोन्याची किंमत 48,450 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचली आहे. तर चांदीची प्रति किलो 61,000 रुपये प्रति किलोग्रॅम भावाने विक्री करण्यात आली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सोन्याला प्रति 10 ग्रॅम 48,450 रुपये भाव मिळाला. तर चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 60,435 रुपयांवर पोहोचला आहे.
इतर बातम्या
GDP मीटर : नव्या व्हेरियंटची मार्केटला धास्ती, अर्थचक्राच्या गतीला ‘ओमिक्रॉन’मुळं ब्रेक?
गृहकर्ज हस्तांतरण करणे बचतीचे आणि फायदेशीर, ‘अशी’ आहे एसबीआयची व्यवहारिक आकडेमोड