Aadhaar Card लॉक करण्याची ही सोपी पद्धत, नाही होणार चुकीचा वापर

Aadhaar Card | UIDAI तुम्हाला अनेक फीचर्स देते. त्याच्या मदतीने आधार कार्ड आणि त्यासंबंधीची माहिती हँकर्स, चोरट्यांपासून वाचविता येते. या फीचरच्या मदतीने तुम्ही बायोमॅट्रिक्स लॉक करु शकता. त्यामुळे तुमची माहिती लिक होत नाही. हे फीचर उपयोगी आहे. तुमच्या परवानगीशिवाय आधार कार्डचा कोणीही वापर करु शकणार नाही.

Aadhaar Card लॉक करण्याची ही सोपी पद्धत, नाही होणार चुकीचा वापर
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 4:42 PM

नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : काल परवाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला असेल. अनेक भारतीयांचा डेटा Dark Web वर विक्री होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. एका अमेरिकन सायबर सिक्युरिटी फर्मने आपल्या अहवालात याविषयीचा दावा केला आहे. पण ही माहिती समोर येताच हॅकर्सने लागलीच या फाईल्स या प्लॅटफॉर्मवरुन हटवल्या. डार्क वेबवर उपलब्ध डेटामध्ये युझर्सचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक यासह इतर अनेक माहिती सविस्तरपणे देण्यात आली होती. पण आधार कार्डच्या या एका फीचरमुळे तुमची माहिती सुरक्षित राहील. कोणते आहे हे फीचर?

आधार कार्ड लॉक

तुम्हाला आधार कार्डचा गैरवापर होत असल्याचे जाणवल्यास तुम्हाला आधार कार्ड लॉक करता येते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक फीचर्स आणले आहेत. त्यातील आधार कार्ड लॉकचे फीचर उपयोगी पडते. त्याआधारे तुमचा डेटा सुरक्षित राहतो. तुमची खासगी माहिती लिक होत नाही.

हे सुद्धा वाचा

असे करा आधार लॉक

  1. आधार बायोमॅट्रिक्स लॉक करणे अत्यंत सोपे आहे. त्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. याठिकाणी तुम्हाला My Aadhaar चा पर्याय मिळले. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला लॉगइन करावे लागेल. लॉगइन केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लॉक करता येईल.
  2. आधार लॉक करण्यासाठी तुम्हाला 16 डिजिट व्हर्च्युअल आयडी क्रिएट करावा लागेल. तुम्ही VID च्या मदतीने तुमचे आधार कार्ड लॉक करु शकतात. तर गरज असेल त्यावेळी आधार कार्ड अनलॉक पण करता येईल. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
  3. या ठिकाणी My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी अनेक पर्याय समोर येतील. त्यातून तुम्हाला लॉक, अनलॉक हा पर्याय मिळेल. VID तयार केल्यावर आधार लॉक करण्यासाठी तुम्हाला व्हर्च्युअल आयडी, पूर्ण नाव, पिन कोड आणि कॅप्चा एंटर करावा लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाका. त्याआधारे आधार लॉक करता येईल.

काय होईल फायदा

आधार बायोमॅट्रिक्स लॉक फीचर ऑन केल्यानंतर इतर कोणीही तुमच्या बायोमॅट्रिक्सचा वापर करु शकणार नाही. हे फीचर युझर्सच्या सुरक्षेसाठी आहे. त्याआधारे आधार संबंधीची माहिती चोरी करता येणार नाही. त्याचा गैरवापर होणार नाही. तसेच त्यामाध्यमातून तुमची आर्थिक फसवणूक ही करता येणार नाही.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.