ऑनलाइन शिक्षण : विद्यार्थी ‘स्क्रीन’च्या आहारी, नैराश्यासह मानसिक संतुलन ढासळले!

लहान वयांच्या मुलांमध्ये अधिक वेळ टीव्ही पाहणे आणि गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नैराश्य, शारीरिक हालचालीत असंतुलन, एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या आढळून आल्या आहेत.

ऑनलाइन शिक्षण : विद्यार्थी 'स्क्रीन'च्या आहारी, नैराश्यासह मानसिक संतुलन ढासळले!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 9:17 PM

नवी दिल्ली : कोविड (Covid) प्रकोपामुळे लोकल ते ग्लोबल परिणामांना सामोरे जावे लागले. सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन(Lockdown)चा मार्ग अवलंबण्यात आला. जगाच्या व्यवहाराचं गतिचक्र ठप्प झाल्याने ऑनलाइन (Online) व्यवहारांवर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनाही ई-शिक्षणाचा मार्ग धरावा लागला. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे. तसेच मुले मोबाइलच्या आहारी गेल्याचे प्रमाण वाढले आहे. कॅनडामध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य अहवालाच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे.

स्क्रीन आणि मानसिक विकारांचा थेट सहसंबंध

टोरंटोस्थित बालआरोग्य तज्ज्ञांच्या अभ्यासगटाने निष्कर्ष काढले आहेत. विभिन्न प्रकारचे स्क्रीन आणि मानसिक विकारांचा थेट सहसंबंध अभ्यासातून पुढे आला आहे. लहान वयांच्या मुलांमध्ये अधिक वेळ टीव्ही पाहणे आणि गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नैराश्य, शारीरिक हालचालीत असंतुलन, एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या आढळून आल्या आहेत.

अभ्यासकांची मते

बालकांत याप्रकारची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. अधिक वेळ ‘स्क्रीन’वर व्यस्त असणे आणि सामाजिक संपर्क कमी असणे ही मुख्य कारणे आहेत. विद्यार्थ्यांच्या दिनचर्येत कोविड प्रकोपामुळे अमुलाग्र बदल झाले आहेत. सामाजिक अंतर, एकांतवास आणि दीर्घकाळ शाळा बंद असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे मत अभ्यासकांनी नोंदविले आहे.

अहवालाची प्रमुख उद्दिष्टे :  – कॅनडातील 2026 विद्यार्थ्यांचा अभ्यासात समावेश – सर्वेक्षणातील 532 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 5.9 वर्ष – 1494 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 11.3 वर्ष – 237 विद्यार्थ्यांना यापूर्वीच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरची लक्षणे -टीव्ही आणि डिजिटल मीडियामध्ये अतिव्यस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांत व्यवहार संबंधित समस्या, नैराश्य, मानसिक असंतुलन -व्हिडिओ गेममध्ये अतिव्यस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा वाढीस लागल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

समस्येवर तज्ज्ञांचा मार्ग :

– विद्यार्थ्यांसोबत पालकांनी अधिकाधिक संवाद वाढावा. विद्यार्थ्यांचा ‘स्क्रीन’ टाइम कमी करण्यासाठी पालकांनी उपाय योजायला हवेत.

– विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल ओळखून त्यांना आवडत्या गोष्टींत रममाण होण्यासाठी संधी द्या.

– चित्रकला, ओरिगामीसारखे छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्या. विद्यार्थी ‘स्क्रीन’पासून दूर जाण्यास मदत होईल.

– मोकळ्या मैदानात जाणं शक्य नसल्यास इमारतीचे टेरेस किंवा घरातील मोकळ्या जागेत शारीरिक कसरती/व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा.

– विद्यार्थ्यांचे नियमित वेळापत्रक बनवा. अभ्यासासोबत छंद, व्यायाम यांनाही वेळ राखून ठेवा.

Healthy Breakfast: नाश्त्यात काय खाणार, ओट्स की फ्लेक्स; माहिती करून घ्या काय आहे हेल्दी?

कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येने हैराण आहात? मग हे घरगुती हेअर मास्क वापरून पाहा!

Skin Care : हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पेयांचा आहारात समावेश करा!

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.