Ramdev Baba यांची कंपनी देतेय कमाईची संधी, संधीचे करा सोने; 28 मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी

बाबा रामदेव यांची रुची सोया ही कंपनी गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची संधी देत आहे. अशा वेळी फायदा करून घ्यायचा असेल तर अंतिम तारखेपूर्वी गुंतवणूक करावी लागेल. या एफपीओमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवता येईल. कंपनीचा एफपीओ सुमारे 4,300 कोटी रुपयांचा आहे.

Ramdev Baba यांची कंपनी देतेय कमाईची संधी, संधीचे करा सोने; 28 मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी
बाबा रामदेव यांची रुची सोया ही कंपनी Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 3:06 PM

बाबा रामदेव यांची रुची सोया (Ruchi Soya) ही कंपनी गुंतवणूकदारांना (Investment) पैसे कमावण्याची संधी देत आहे. ही संधी सेबीच्या (SEBI) नियमात आली आहे. अशा परिस्थितीत कोणीही गुंतवणूक करून नफा कमावू शकतो. मात्र, ही संधी काही मर्यादित दिवसांपुरतीच आहे. अशा वेळी फायदा करून घ्यायचा असेल तर अंतिम तारखेपूर्वी गुंतवणूक करावी लागेल. या एफपीओमध्ये 28 मार्च 2022 रोजी पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीचा एफपीओ सुमारे 4,300 कोटी रुपयांचा आहे. रुची सोया एफपीओ अंतर्गत हा शेअर 615 ते 650 रुपयांपर्यंत आहे. सेबीचा नियम भंग होऊ नये यासाठी रुची सोयामध्ये प्रमोटरची हिस्सेदारी सध्या सुमारे 98 टक्के आहे. प्रमोटरचा हिस्सा कमी करण्यासाठी कंपनीला हा एफपीओ आणावा लागला आहे.

जाणून घेऊयात काय आहे ही कमाईची संधी

रुची सोयाची एफपीओ

बाबा रामदेव यांची कंपनी रुची सोया यांची फॉलोऑन पब्लिक ऑफर (FPO) गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एफपीओ अंतर्गत कंपनी बाजारभावापेक्षा कमी दराने शेअर्स बाजारात दाखल करणार आहे. अशावेळी या एफपीओमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवता येईल. कंपनीचा एफपीओ सुमारे 4,300 कोटी रुपयांचा आहे.

जाणून घेऊया रुची सोया एफपीओची माहिती

रुची सोयाचा एफपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या एफपीओमध्ये 28 मार्च 2022 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. तुमचं डिमॅट खाते असेल तर या एफपीओमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी पैशात शेअर्स खरेदी करु शकता.

शेअर 615 ते 650 रुपयांदरम्यान मिळणार

रुची सोया एफपीओ अंतर्गत हा शेअर 615 ते 650 रुपया दरम्यान मिळणार आहे. रुची सोया एफपीओमध्ये गुंतवणूक केली तरी चांगली कमाईची संधी आहे. सध्या हा शेअर 880 रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे आता या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

जाणून घ्या किती किमान शेअर्ससाठी अर्ज करावा

रुची सोयाच्या एफपीओमधील लोकांनी किमान 21 शेअर्ससाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही प्राइस बँडच्या वरच्या स्तरावर बोली लावल्यास तुम्हाला किमान 13,650 रुपये गुंतवावे लागतील. त्याचबरोबर यापेक्षा जास्त शेअर्ससाठी बोली लावायची असेल तर 21 च्या पटीत गुंतवणूक करावी लागेल.

एफपीओ आणण्यामागे काय आहे हेतू

सेबीच्या नियमानुसार कंपनीला हा एफपीओ आणायचा होता. शेअर बाजारात कंपनी सुचीबद्ध झाल्यास त्यातील प्रवर्तकांची हिस्सेदारी 75 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, असा सेबीचा नियम आहे. त्याचबरोबर रुची सोयामध्ये प्रमोटरची हिस्सेदारी सध्या सुमारे 98 टक्के आहे. प्रमोटरचा हिस्सा कमी करण्यासाठी कंपनीला हा एफपीओ आणावा लागला आहे.

Video Nagpur | विदर्भातून शिवसेनेला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळणार? शिवसंपर्क अभियानानंतर मुंबईत हालचाली वाढल्या

Nandurbar Accident | कंटेनर-आर्टिका गाडीचा भीषण अपघात, तीन जण ठार, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.