पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक कशी कराल, कमी पैसे खर्च करुन जास्त सोनं कसं साठवाल?
Gold Bonds | पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करताना ती विशिष्ट पद्धतीने आणि नियोजनपूर्वक करावी लागते. घरातील किंवा बँकेच्या लॉकरमध्ये पडून असलेल्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा पेपर गोल्ड हे जास्त परतावा देते.
मुंबई: कोरोना संकटाच्या अनिश्चित वातावरणात भांडवली बाजार किंवा गुंतवणुकीच्या इतर साधनांऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्याला लोक जास्त प्राधान्य देत आहेत. केवळ दागिने खरेदी करण्याऐवजी ईटीएफ गोल्ड किंवा गोल्ड बाँडस (Gold Bond) खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. भविष्यात अडचणीच्या वेळी पेपर गोल्डच्या स्वरुपातील हे सोनं विकून तुम्हाला झपटप पैसेही मिळवता येऊ शकतात.
मात्र, पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करताना ती विशिष्ट पद्धतीने आणि नियोजनपूर्वक करावी लागते. घरातील किंवा बँकेच्या लॉकरमध्ये पडून असलेल्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा पेपर गोल्ड हे जास्त परतावा देते. बाजारपेठेवर नजर ठेवून योग्यवेळी हे सोने खरेदी करत राहिल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक कशी कराल?
सॉवरेन गोल्ड बाँडसच्या माध्यमातून तुम्ही अगदी एक ग्रॅम सोन्यापासून गुंतवणूक करु शकता. तुम्ही जास्तीत जास्त 4 किलो सोन्याचे सॉवरेन बाँडस खरेदी करु शकता. सध्याच्या चौथ्या सिरीजमधील 1 ग्रॅम गोल्ड बाँडसची किंमत 4790 रुपये इतकी आहे. मागच्या सिरीजमध्ये एक ग्रॅम सोन्याचा दर 4807 रुपये इतका होता. डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना गोल्ड बाँडसच्या खरेदीत एका ग्रॅममागे 50 रुपयांची सूटही दिली जात आहे.
पेपर गोल्ड म्हणजे काय?
सॉवरेन गोल्ड बाँडस हे पेपर गोल्ड प्रकारात मोडते. यामध्ये कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्ही सोने खरेदी करता. बाजारपेठेतील सोन्याच्या दरांवर गोल्ड बाँडसची किंमत अवलंबून असते. या गोल्ड बाँडसवर तुम्हाला व्याजही दिले जाते. या बाँडसचा मॅच्युरिटी पिरीयड आठ वर्षांचा आहे.
किती सोनं खरेदी करु शकता?
सॉवरेन गोल्ड बाँडसमध्ये तुम्ही एक ग्रॅम सोन्यापासून 4 किलोपर्यंत गुंतवणूक करु शकता. हे सोनं 24 कॅरेटचं असतं. रिझर्व्ह बँकेने 2015 साली सॉवरेन गोल्ड बाँडसची योजना सुरु केली होती. गेल्यावर्षी रिझर्व्ह बँकेने तब्बल 65 टन सोन्याची विक्री केली. लोकांनी सोनं घरात न ठेवता त्या माध्यमातून पैसे कमवावेत, या उद्देशाने सॉवरेन गोल्ड बाँडसची योजना सुरु करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची संधी, जाणून घ्या कसे आणि कुठून खरेदी कराल?
SBI Gold Loanवर विशेष सवलत, जाणून घ्या फायदा कसा घ्याल आणि अंतिम मुदत कोणती?
Paytm वरून गॅस सिलिंडर करा बुक आणि 2700 रुपये कॅशबॅक मिळवा, ऑफर किती दिवस?