Petrol & Diesel Prices Today: 15 दिवसांच्या ब्रेकनंतर ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा दर
Petrol and Diesel rates | आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेल पुन्हा महागल्याने आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरवाढ होण्याची शक्यता अटळ मानली जात आहे.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरवाढीला गेल्या 15 दिवसांमध्ये लगाम बसल्याचे चित्र दिसत होते. या काळात इंधन स्वस्तही झाले नसले तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात होती. मात्र, आज 16व्या दिवशी काही शहरांमध्ये इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
यामध्ये कोईम्बतूर, इंदूर, इरोड, जमशेदपूर, कानपूर या शहरांचा समावेश आहे. याठिकाणी पेट्रोलच्या दरात 1 ते 4 पैशांची वाढ झाली आहे. डिझेलचा प्रतिलीटर दर 1 ते 9 पैशांनी वाढला आहे. सध्या भोपाळमध्ये प्रतिलीटर पेट्रोलसाठी (Petrol) 110.20 रुपये तर डिझेलसाठी 98.67 रुपये मोजावे लागत आहेत. भोपाळपाठोपाठ मुंबई आणि दिल्लीत पेट्रोल सर्वाधिक महाग आहे. या दोन शहरांमध्ये प्रतिलीटर पेट्रोलसाठी अनुक्रमे 107.83 आणि 107.84 रुपये मोजावे लागत आहेत. देशपातळीवर पेट्रोल-डिझेलच्या दरात 17 जुलैला शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती.
महाराष्ट्रातील शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा आजचा दर
मुंबई: पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45 पुणे: पेट्रोल- 107.39, डिझेल 95.71 नाशिक: पेट्रोल- 108.14, डिझेल 95.85 औरंगाबाद: पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69 कोल्हापूर: पेट्रोल- 107.89, डिझेल 95.97
17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
संबंधित बातम्या:
देशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…