सरकारच्या ‘या’ योजनेत महिन्याला फक्त 55 रुपये द्या आणि 36 हजार रुपये पेंशन मिळवा
देशातील असंघटीत कामगारांसाठी एक महत्त्वाच्या योजनेची घोषणा झालीय. या योजनेमुळे देशातील 45 लाखपेक्षा अधिक लोकांना फायदा होऊ शकतो.
नवी दिल्ली : देशातील असंघटीत कामगारांसाठी एक महत्त्वाच्या योजनेची घोषणा झालीय. या योजनेमुळे देशातील 45 लाखपेक्षा अधिक लोकांना फायदा होऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून असंघटीत क्षेत्रातील कामगारांना 60 वर्षांनंतर पेंशन दिली जाणार आहे. ही पेंशन दरमहा 3000 रुपये इतकी असेल. यासाठी संबंधितांना दरमहा काही रक्कम भरावी लागणार आहे. हा दर महा हप्ता कामगाराच्या वयानुसार कमी अधिक होईल (Pradhan Mantri Maandhan yojana know how to get pension for unorganized labors).
काय आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना?
मोदी सरकारची ही योजना असंघटीत क्षेत्रातील कामगारांना पेंशन देण्यासाठी आहे. या योजनेत कामगारांना 36 हजार रुपये पेंशन दिली जाणार आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षांचे कामगार सहभागी होऊ शकतात. ही 36 हजार रुपयांची पेंशन दरमहा 3000 रुपये याप्रमाणे मिळणार आहे. या योजनेचा फायदा 36 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना होईल. यासाठी 3.52 लाख कॉमन सर्विस सेंटरही आहेत.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना के तहत पेंशन योजना से असंगठित क्षेत्र के श्रमिकों का हो रहा है भविष्य सुरक्षित।
– 60 वर्ष की आयु के बाद श्रमिकों को 3,000 रुपये/माह की निश्चित पेंशन – 36 राज्य और केंद्र शासित प्रदेश शामिल – 3.52 लाख कॉमन सर्विस सेंटर – 45 लाख लाभार्थी नामांकित pic.twitter.com/g0VQ5fE9oh
— Santosh Gangwar (@santoshgangwar) June 17, 2021
कोणत्या वयाला किती हप्ता?
या योजनेत वयानुसार कामगारांना हप्ता भरावा लागणार आहे. त्यानुसारच पेंशन वाटपही होणार आहे. 18 वर्षे वय असताना या योजनेत सहभाग घेतल्यास संबंधित कामगाराला महिन्याला केवळ 55 रुपये भराव लागतील. मात्र, जर एखाद्या कामगाराने उशिरा 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास त्याला जास्त हप्ता बसेल.
या योजनेत 55 ते 200 रुपये असा हप्ता द्यावा लागतो. ही रक्कम वयानुसार बदलते. साधारणपणे 18 वर्षे वयाच्या एका व्यक्तीला वर्षाला 660 रुपये आणि 42 वर्षात एकूण 27,720 रुपये भरावे लागतील. 30 वर्षे वयाच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षे वयाच्या व्यक्तीला 200 रुपये दर महिन्याला द्यावे लागतील.
या योजनेचा लाभ कुणाला घेता येणार?
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी CSC सेंटरवर जावं लागेल. नोंदणी झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून दरमहा या योजनेचा हप्ता कपात होईल. कामगार जितके पैसे हप्त्याच्या रुपात भरणार आहे तितकीच रक्कम सरकार देणार आहे. याचा लाभ घरकामगार, चालक, प्लंबर, चांभार, टेलर, रिक्षा चालक, धोबी आणि शेतमजूर अशा लोकांना घेता येणार आहे.
हेही वाचा :
NPS पेन्शन स्कीमच्या गुंतवणुकदारांसाठी महत्वाची बातमी; प्लान न घेताच 5 लाख काढता येणार
NPS योजनेत आता मिळणार जास्त नफा, पैसे काढण्याच्या नियमातही बदल होणार
पेन्शन स्कीममध्ये पैसे गुंतवताय; मोदी सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
व्हिडीओ पाहा :
Pradhan Mantri Maandhan yojana know how to get pension for unorganized labors