गुरु-शिष्याची बँकिंगमध्ये एन्ट्री, झुनझुनवाला-दमानींची ‘या’ बँकेत भागीदारी?
आरबीएलच्या व्यवस्थापकीय मंडळाने विश्ववीर आहुजा यांच्या वैद्यकीय रजेच्या अर्जाला मान्यता दिली आणि अंतरिम व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजीव आहुजा यांची तत्काळ नियुक्ती केली. नियमन आणि अन्य प्रस्तावांचे मान्यता अधिकार राजीव आहुजा यांना असणार आहे. बँकेने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये, बँकेच्या व्यवसाय धोरणांसाठी प्रतिबद्ध राहून बँकिंग विकासाच्या दिशेने पावलं टाकली जातील असे म्हटले आहे.
मुंबई : भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आरबीएलमध्ये आर्थिक घडामोडींना वेग आला आहे. भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला आणि डी-मार्टचे सर्वेसर्वा आर के दमानी आरबीएल बँकेत भागीदारी घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. आरबीएलमध्ये 10 टक्के भागीदारीचा झुनझुनवाला-दमानी प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या विचाराधीन असल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप दोघांकडून अधिकृत दुजोरा व्यक्त करण्यात आलेला नाही. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने नुकतीच आरबीएलच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालकपदी योगेश दयाल यांची नियुक्ती केली आहे.
आरबीएल खांदेपालट, शेअर्स घसरले
आरबीएलचे व्यवस्थापकीय संचालक विश्ववीर आहुजा सध्या वैद्यकीय रजेवर गेले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानंतर आरबीएल संचालक मंडळात फेरबदल करण्यात आले. संचालकपदी दयाल यांच्या नियुक्तीनंतर दुसऱ्याच दिवशी भागीदारी खरेदीचे वृत्त चर्चेत आले आहे.दरम्यान, झुनझुनवाला किंवा दमानी यांच्या वतीने कोणतेही अधिकृत पत्रक जारी करण्यात आलेले नाही. दरम्यान, आरबीएलच्या शेअर्सची पडझड दिसून आली. शुक्रवारी आरबीएलच्या शेअर्सची पडझड दिसून आली. शुक्रवारी 3.06 अंकाच्या घसरणीसह 172.50 रुपयांवर बंद झाला. सध्या बँकेचे 10, 340 कोटींचे बाजार भांडवल आहे.
राजीव आहुजा सूत्रधार
आरबीएलच्या व्यवस्थापकीय मंडळाने विश्ववीर आहुजा यांच्या वैद्यकीय रजेच्या अर्जाला मान्यता दिली आणि अंतरिम व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजीव आहुजा यांची तत्काळ नियुक्ती केली. नियमन आणि अन्य प्रस्तावांचे मान्यता अधिकार राजीव आहुजा यांना असणार आहे. बँकेने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये, बँकेच्या व्यवसाय धोरणांसाठी प्रतिबद्ध राहून बँकिंग विकासाच्या दिशेने पावलं टाकली जातील असे म्हटले आहे.
कोविडचा फटका, बँक ऑन ट्रॅक
आरबीएलने जारी केलेल्या निवेदनात कोविडमुळे व्यवहारांना बसलेल्या आर्थिक तोट्याचा उल्लेख केला आहे. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या कामगिरीवरुन बँक कोविड परिणामातून सावरत असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात एनपीए गुणोत्तरात संतुलन आणि पर्याप्त भांडवल गुणवत्तेत वाढ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे बँकेने म्हटले आहे.
कोण आहेत झुनझुनवाला?
राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज मानले जातात. भारताचे वॉरेन बफे म्हणून त्यांची ओळख आहे. नवख्या गुंतवणूकदारांसोबतच मार्केटच्या नजरा झुनझुनवाला यांच्या स्ट्रॅटेजीकडे लागलेल्या असतात. बाजाराचा नफा व तोटा यांची अचू जाण झुनझुनवाला यांना आहे. व्यवसायाने सीए असलेले झुनझुनवाला यांनी वित्तीय संस्थांच्या संचालक मंडळात काम केले आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्यांनी 48 वे स्थान पटकाविले होते.
इतर बातम्या
बाराखडी अर्थसाक्षरतेची : चालू व बचत खात्यातील महत्त्वाचे ‘4’ फरक, जाणून घ्या…
नव्या वर्षात करा गुंतवणुकीचा श्रीगणेशा, पोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजना कोणती?, व्याजदर काय?