‘या’ बँकेत तुमचं खातं आहे का, नाशिकमधील सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई

RBI | जनलक्ष्मी सहकारी बँकेने जमा खात्यांमधील रक्कमेची प्लेसमेंट आणि क्रेडिट इन्फोर्मेशन कंपनीज (CICs) संबंधित निर्देशांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे समजते.

'या' बँकेत तुमचं खातं आहे का, नाशिकमधील सहकारी बँकेवर RBI ची मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 10:04 AM

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकमधील जनलक्ष्मी सहकारी बँकेवर (Janalaxmi Co-operative Bank) कारवाई करण्यात आली आहे. या बँकेला 50.35 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जनलक्ष्मी सहकारी बँकेने जमा खात्यांमधील रक्कमेची प्लेसमेंट आणि क्रेडिट इन्फोर्मेशन कंपनीज (CICs) संबंधित निर्देशांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचे समजते.

याशिवाय, रिझर्व्ह बँकेकडून गाझियाबाद येथील नोएडा कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेवरही दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकेला कर्जासंबंधीच्या नियमांचे पालन न केल्याने 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच RBI ने सायबर संरक्षण धोरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अ‍ॅक्सिस बँकेला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. स्पॉन्सर बँका आणि SCBs/UCBs यांच्यातील पेमेंट यंत्रणा मजबूत करण्यावर रिझर्व्ह बँकेकडून भर दिला जात आहे. त्यादृष्टीने काही धोरणे आखून देण्यात आली आहेत. या धोरणांचे पालन न करणाऱ्यांकडून रिझर्व्ह बँक दंडात्मक कारवाई करते. रिझर्व्ह बँकेकडून आतापर्यंत बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यासह 14 बँकांवर कारवाई केली होती.

सारस्वत आणि एसव्हीसी सहकारी बँकेवर कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक (Saraswat Co-operative Bank Ltd) आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा (SVC Bank) समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांवर कारवाई

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ((Indapur Urban Cooperative Bank) 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला (The Baramati Sahakari Bank Limited) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.

संंबंधित बातम्या:

आरबीआय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, काय आहे विशेष? कोणत्या बॅंकांवर परिणाम होईल?

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.