Sachin tendulkar : मास्टर ब्लास्टरची नवी ‘इनिंग’; कार कंपनीत कोट्यावधींची गुंतवणूक!

सचिन ‘स्पिनी’चा गुंतवणूक रणनीतीकार म्हणून कार्यरत असणार आहे. जागतिक स्तरावरुन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सचिनची भूमिका असणार आहे. 'स्पिनी'चे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंह यांनी 'स्पिनी'सोबतच्या सचिनच्या भागीदारीला दुजोरा दिला आहे.

Sachin tendulkar :  मास्टर ब्लास्टरची नवी ‘इनिंग’; कार कंपनीत कोट्यावधींची गुंतवणूक!
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 5:15 PM

मुंबई : क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती पत्करलेल्या सचिन तेंडुलकरने उद्योग विश्वात पाऊल टाकले आहे. जुन्या कारच्या विक्री व्यवहारात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ‘स्पिनी’ (Spinny) कंपनीसोबत सचिनने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ‘स्पिनी’ कंपनीसोबत सचिनने सह-भागीदारी स्विकारली आहे. मात्र, गुंतवणुकीच्या आकडा अद्याप गुलदस्त्यातच आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू नंतर ‘स्पिनी’ सोबत भागीदारी करणारा सचिन दुसरा खेळाडू ठरला आहे.

‘स्पिनी’ने याविषयीचे अधिकृत पत्रक जारी केले आहे. सचिन ‘स्पिनी’चा गुंतवणूक रणनीतीकार म्हणून कार्यरत असणार आहे. जागतिक स्तरावरुन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सचिनची भूमिका असणार आहे. ‘स्पिनी’चे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंह यांनी ‘स्पिनी’सोबतच्या सचिनच्या भागीदारीला दुजोरा दिला आहे. भारत हा युवकांचा देश आहे. युवकांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतातील उद्योजक प्रयत्नशील असल्याचे सचिनने कारारानंतर म्हटले आहे.

‘स्पिनी’च्या शिरपेचात युनिकॉर्नचा तुरा:

‘स्पिनी’ने नुकतेच सीरिज-ई दरम्यान 28.3 कोटी डॉलरचे फंडिंग जमविले होते. ‘स्पिनी’ने युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त केला आहे. सीरिज-ईचे नेतृत्व अबुधाबी स्थित एडीक्यू, टायगर ग्लोबल यांनी केले होते. कंपनीच्या वर्तमान गुंतवणुकदारांत फिरोज दिवाण, एरिना होल्डिंग्स आणि थिंक इन्व्हेस्टमेंट्चा समावेश होतो. 15 शहर, 23 हब:

‘स्पिनी’चे सध्या 15 शहरात कार्यरत 23 कार हब आहेत. युनिकॉर्न क्लबमध्ये आतापर्यंत 40 भारतीय स्टार्ट-अपने स्थान प्राप्त केले आहे आणि 38 अरब डॉलरहून अधिक फंडिंग जमा केले आहे.

कार खरेदी एका क्लिकवर: भारतात हजारो जुन्या कारच्या विक्रीचे व्यवहार केले जातात. ऑफलाईन किंवा पारंपरिक खरेदी मार्गाने अधिक वेळ लागतो. ‘स्पिनी’ने ग्राहकांना जुन्या कारचे एकाधिक पर्याय उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही मध्यस्थाविना थेट जुन्या कारची जोखीम रहित खरेदी करणे शक्य ठरले आहे.

Nagpur | 80 वर्षीय आजीची कर्करोगाशी झुंज, पाच मुलांनी सोडले वाऱ्यावर?; नातू करतो सेवा!

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; पुणे म्हाडा’ मार्फत 5 हजार 183 गरजू कुटुबांना मिळणार हक्काचे घर

एका क्लिकवर कारचं रुप बदला, BMW रंग बदलणारी कार सादर करणार

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.