SBI Personal Loan: घरबसल्या एका क्लिकवर मिळवा 35 लाख; जाणून घ्या कोणाला मिळू शकते कर्ज
स्टेट बँक ऑफ इंडियाने योनो अॅपच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज योजना आणली आहे. रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट सादर केले जाते. पात्र ग्राहकांना आता योनो अॅपवर कोणत्याही कागदपत्रांशिवाय 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेता येणार आहे.
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांसाठी अवघ्या एका क्लिकवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. बॅंकेच्या योनो अॅपवर रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट योजना सादर केली आहे. ग्राहकांना कर्जासाठी बॅंकेत जाण्याची गरज नाही.पात्र ग्राहकांना आता योनो अॅपवर (YONO App) ग्राहकांना वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी एसबीआय बँकेच्या कोणत्याही शाखेत जावे लागू नये, यासाठी त्यांना सुविधा आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम बनविणे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. एसबीआय रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिटवरील (RTXC) पर्सनल लोन फीचर पगारदार ग्राहकांना उपलब्ध आहे. ज्यांचे बॅंकेत वेतन खाते आहे, ते या कर्जासाठी पात्र आहे. कर्ज सुलभतेसाठी पात्रता, क्रेडिट चेक, कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केल्या जातील.
यांना होईल फायदा
बँकेने म्हटल्यानुसार, रियल टाइम एक्सप्रेस क्रेडिट अंतर्गत, केंद्र किंवा राज्य सरकार आणि बँकेत वेतन खाते असलेल्या ग्राहकांना यापुढे शाखेत जाऊन वैयक्तिक कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही. एसबीआयने म्हटले आहे की क्रेडिट चेक, पात्रता, मंजुरी आणि दस्तऐवजीकरण आता रिअल टाइममध्ये डिजिटलपद्धतीने करण्यात येणार आहे. बँकेचे अध्यक्ष दिनेशकुमार खरा यांनी सांगितले की, एक्सप्रेस क्रेडिट प्रॉडक्टच्या मदतीने बँकेच्या ग्राहकांना डिजिटल, विनाव्यत्यय आणि पेपरलेस कर्जप्रक्रियेचा अनुभव घेता येईल.
एसबीआयमध्ये वेतन खाते असणाऱ्यांना एसबीआयची रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये एका अटींची पूर्तता करावी लागणार आहे, या कर्ज योजनेसाठी कर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 15 हजार रुपये असणे आवश्यक आहे. केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि नफा कमावणारे राज्य सरकारचे सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय प्रतिष्ठा असलेल्या शैक्षणिक संस्था, निवडलेले नगरसेवक ,त्यांचे बँकेशी संबंध असोत वा नसोत. या सगळ्यांसोबत काम करणं महत्त्वाचं असल्याचं बॅंकेने स्पष्ट केले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या लाखो ग्राहकांना एक मोठी भेट दिली होती. एसबीआयने आपल्या दीर्घ कालावधीच्या ठेवींवरील (2 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक) व्याजदरात 40 ते 90 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. नवे दर 10 मे 2022 पासून लागू झाले आहेत.