शेअर बाजारात तेजी: निर्देशांकात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, निफ्टी 18050 अंकावर बंद
आजच्या शेअर मार्केटच्या व्यवहारात तेजीचे वातावरण एनर्जी आणि आयटी सेक्टरमध्ये पाहायला मिळालं. दोन्ही सेक्टरचे निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. बँकिंग सेक्टर, फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर, हेल्थकेअर, ऑईल अँड गॅस सेक्टरमध्ये देखील तेजीचं वातावरण दिसून आलं.
नवी दिल्ली- शेअर बाजारात (stock market today) सलग तिसऱ्या दिवशी तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. शेअर व्यवहारांत तेजी-घसरणीचे चित्र दिसून आले. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचडीएफसी बँक या मोठ्या स्टॉक्समध्ये तेजीमुळे प्रमुख इंडेक्समध्ये तेजी दिसून आली. आजच्याव्यवहारात सेंन्सेक्स (Sensex) 221 अंकाच्या वाढीसह 60617 स्तरावर पोहोचला आणि निफ्टी (Nifty) 52 अंकांच्या वाढीसह 18056 स्तरावर बंद झाला.
एनएसई वर आज (मंगळवार) आयटी सेक्टरमध्ये वाढ नोंदविली गेली. मेटल स्टॉक्सची सरासरी कामगिरी दिसून आली. छोट्या स्टॉक्सच्या गुंतवणुकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला.
आजचे मार्केट अपडेट:
शेअर बाजारात चढ-उताराचे चित्र दिसून आले. सेन्सेंक्सने कमाल 60,689.25 अंकांची पातळी गाठली. घसरणीनंतर इंडेक्स 60,281.52 टप्प्यावर पोहोचला. शेअर मार्केटमध्ये ओमिक्रॉनच्या वाढत्या संख्येमुळे अनिश्चिततेचे वातावरण दिसून आले.
गुंतवणुकदार स्टॉक नुसार व्यवहार करत आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या निर्बंधामुळे गुंतवणुकदारांनी सावधानता बाळगल्याचे चित्र आहे. छोट्या गुंतवणुकदारांवरही शेअर मार्केटच्या बदलत्या चित्राचा परिणाम दिसून आला. निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्स घसरणीसह बंद झाला. एनएसईवर ब्रॉड मार्केटमध्ये सर्वाधिक तेजी निफ्टीमध्ये नोंदविली गेली.
कुठे कमाई आणि कुठे नुकसान:
आजच्या शेअर मार्केटच्या व्यवहारात तेजीचे वातावरण एनर्जी आणि आयटी सेक्टरमध्ये पाहायला मिळालं. दोन्ही सेक्टरचे निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. बँकिंग सेक्टर, फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर, हेल्थकेअर, ऑईल अँड गॅस सेक्टरमध्ये देखील तेजीचं वातावरण दिसून आलं. दुसरीकडे मेटल सेक्टरच्या निर्देशांकात सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. मेटल सेक्टरचा निर्देशांक 1.9 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. एफएमसीजी सेक्टर, सरकारी बँकांत घसरण नोंदविली गेली. निफ्टीत समाविष्ट 25 स्टॉक आज तेजीसह बंद झाले.
आजचे ‘टॉप’ शेअर्स:
आज खालील टॉप-5 शेअर्सच्या कामगिरीत वाढ नोंदविली गेली. शेअर्स व वाढीची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
• एचसीएल टेक 4.49 टक्के • अदानी पोर्ट्स 3.53 टक्के • एचडीएफसी 1.8 टक्के • टीसीएस 0.96 टक्के • रिलायंस इंडस्ट्रीज 0.73 टक्के
आजची सर्वाधिक घसरण
• जेएसडब्लू स्टील 3.41 टक्के • टाटा स्टील 2.92 टक्के • बीपीसीएल 1.65 टक्के