रेल्वेत तुमच्या बर्थवर कोणी बसू शकत नाही, TTE रात्री तिकीट चेक करु शकत नाही… रेल्वेचे हे नियम तुमच्यासाठी फायदेशीर
indian railway important rule for passengers: रात्री दहा वाजेनंतर कोणताही सहप्रवाशी मोबाईलवर किंवा इतर गॅजेटवर आवाज करणारे गाणे लावू शकत नाही. त्याला रात्री दहानंतर मोबाईलवर गाणे, चित्रपट पाहायचे असेल तर त्याला एअरफोनचा वापर करणे सक्तीचे असले. या नियमाप्रमाणे कोणी वागले नाही तर त्याची तक्रार रेल्वे कर्मचाऱ्याकडे करता येते.
भारतीय रेल्वेने मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. रेल्वेतून रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असते. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी सर्वात चांगला पर्याय रेल्वे आहे. त्यासाठी रेल्वेचे आरक्षण करुन आरामदायक प्रवास करण्याचा प्रयत्न सर्वच जण करतात. परंतु रेल्वेने प्रवास करताना अनेक महत्वाच्या नियमांची माहिती नसते. यामुळे सहप्रवाशी असलेल्या लोकांशी भांडण होते. रेल्वेने प्रवास करताना हे नियम माहिती असल्यास तुमचा प्रवास अधिक चांगला होणार आहे.
काय आहे नियम
रेल्वेत तुम्हाला मिडल बर्थ मिळाल्यास अडचण होते. लोअर बर्थ असणारा व्यक्ती खालचा सीटवर झोपून राहतो. मग मिडल बर्थ असणाऱ्या व्यक्तीला बसण्यासाठी जागा मिळत नाही. परंतु रेल्वे नियमानुसार सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लोअर बर्थ बसण्यासाठी असतो. या वेळेत लोअर, मिडल आणि अप्पर बर्थ असणारे तिघे जण बसून प्रवास करु शकतात. मिडल बर्थ वाल्या व्यक्तीस गरज वाटली आणि लोअर बर्थच्या व्यक्तीने समंती दिली तर मधला बर्थ लावून दोघे प्रवाशी झोपून प्रवास करु शकतात.
टीटीई रात्री चेक करु शकत नाही
अनेकवेळा टीटीई रात्री तिकीट तपासणीसाठी येतो. परंतु रेल्वे नियमानुसार रात्री दहा वाजेनंतर झोपलेल्या प्रवाशाला उठवून टीटीई तिकीट चेक करु शकत नाही. रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत धावत्या ट्रेनमध्ये टीटीईला तिकीट चेक करता येत नाही. त्याला सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत तिकीट चेक करता येते.
रात्री गाणे लावू शकत नाही
रात्री दहा वाजेनंतर कोणताही सहप्रवाशी मोबाईलवर किंवा इतर गॅजेटवर आवाज करणारे गाणे लावू शकत नाही. त्याला रात्री दहानंतर मोबाईलवर गाणे, चित्रपट पाहायचे असेल तर त्याला एअरफोनचा वापर करणे सक्तीचे असले. या नियमाप्रमाणे कोणी वागले नाही तर त्याची तक्रार रेल्वे कर्मचाऱ्याकडे करता येते. त्यानंतर रेल्वे कर्मचारी त्या व्यक्तीला समज देईल. त्यानंतरही त्याने ऐकले नाही तर त्याच्यावर कारवाई होते. रेल्वेने प्रवास करताना या सर्व नियामांची माहिती प्रवाशांना गरजेची आहे.