AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! पीएफ अकाऊंट आधारला लिंक करण्यासाठी मुदतवाढ, पण फक्त ‘या’ राज्यांनाच मिळणार सूट

PF Aadhaar Linking | पीएफ अकाऊंटचा यूएन नंबर आधारशी लिंक केल्यास पीएफचे पैसे काढणे आणि ते ट्रान्सफर करणे सोपे होते. तसेच कंपन्यांनी ईपीएफओकडे नियमितपणे कर्मचाऱ्यांच्या तपशीलासह इलेक्ट्रॉनिक चलान आणि रिटर्न्स जमा करणे गरजेचे आहे.

सावधान! पीएफ अकाऊंट आधारला लिंक करण्यासाठी मुदतवाढ, पण फक्त 'या' राज्यांनाच मिळणार सूट
पीएफ आधार लिंकिंग
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 7:39 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मात्र, ही सूट सर्वांसाठी नसेल. केवळ ईशान्य भारतातील सात राज्यांमधील बांधकाम आणि प्लांटेशन कंपन्यांना पीएफ अकाऊंट आधारशी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

पीएफ अकाऊंटचा यूएन नंबर आधारशी लिंक केल्यास पीएफचे पैसे काढणे आणि ते ट्रान्सफर करणे सोपे होते. तसेच कंपन्यांनी ईपीएफओकडे नियमितपणे कर्मचाऱ्यांच्या तपशीलासह इलेक्ट्रॉनिक चलान आणि रिटर्न्स जमा करणे गरजेचे आहे.

पीएफ अकाऊंट आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ का?

UAN आधारशी जोडण्यात सदस्यांना आणि कंपन्यांना येणाऱ्या अडचणी पाहता, 1 सप्टेंबरची तारीख वाढवण्यात आली होती. कोरोना महामारीची दुसरी लाट पाहता, आधार अद्ययावत करण्यास विलंब झाल्यामुळे किंवा कोणत्याही सुधारणेमुळे शेवटची तारीख वाढवण्यात आली होती. हा नियम आधी जूनमध्ये लागू करण्यात येणार होता. परंतु केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर EPFO ​​ने तो 1 सप्टेंबरपर्यंत वाढवला. नंतर, ही मुदत ईशान्येकडील 7 राज्यांसाठी आणि काही कंपन्यांसाठी 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पीएफ खाते आधारशी लिंक कसे कराल?

स्टेप-1: ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा स्टेप-2: त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा स्टेप-3: यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा. स्टेप-4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप-5: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.

पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास होणार रद्द

पॅनकार्ड आधार कार्डासोबत लिंक न केल्यास भविष्यात तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पॅनकार्ड (Pancard) आधारशी न जोडल्यास ते रद्द होईल. तसेच तुम्हाला 1000 रुपयांचा दंडही ठोठावला जाईल. (If you not link pancard to Aadhar card then it will get canclled after 30 June 2021)

सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे. त्यामुळे तुम्ही पॅनकार्ड आणि आधार लिंक करणे गरजेचे आहे.

संंबंधित बातम्या:

नोकरदार, मजुरांसाठी मोठी बातमी, सामाजिक सुरक्षा संहिता लवकरच लागू होणार, श्रमिकांना काय फायदा?

आपणही PF खातेधारक असाल तर ‘हे’ काम लवकर करा, अन्यथा पैसे काढता येणार नाही

UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.