‘या’ बँका देतात झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर अधिक व्याज, खाते उघडण्यापूर्वी यादी चेक करा
देशात अशाही काही बँका आहेत, ज्या झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर देखील चांगल्या सुविधा तसेच व्याजदर देतात. आज आपण अशाच काही बँकांबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्या बँका आपल्या ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर देखील चांगले व्याज देतात.
नवी दिल्ली : देशात अशा अनेक छोट्या -मोठ्या बँका आहेत, त्या आपल्या ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्याची (Zero balance saving account) सुविधा पुरवतात. झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते म्हणजे असे खाते असते, की ज्या खात्यामध्ये तुम्हाला मिनिमम रक्कम ठेवण्याची आवश्यकता नसते. म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या खात्यामधून सर्व पैसे काढले तरीही बँकेकडून कोणताही चार्ज आकारला जात नाही. या उलट अशाही काही बँका आहेत, की ज्या बँकांमध्ये तुम्हाला मिनिमम रक्कम ठेवावीच लागते. झिरो बॅलन्स खाते हे अशा ग्राहकांसाठी उपयुक्त असते, ज्यांचे मासिक उत्पन्न फिक्स नसते. ज्यांना आपले खाते मेंटेन ठेवणे जमत नाही.
देशात अशाही काही बँक आहेत, ज्या झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर देखील चांगल्या सुविधा तसेच व्याजदर देतात. आज आपण अशाच काही बँकांबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्या बँका आपल्या ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर देखील चांगले व्याज देतात. परिणामी सध्या अशा बँकांमधील खात्याच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
आयडीएफसी फस्ट बँक (IDFC First Bank)
आयडीएफसी फस्ट बँकेमध्ये खाते उघडण्याचा मुख्य फायदा म्हणजे ही बँक झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर ग्राहकांना चार टक्क्यांपर्यंत व्याज देते. तसेच या बँकेच्या एटीएममधून तुम्ही एका दिवसात चाळीस हजारांपर्यंतची रक्कम काढू शकता. तसेच या बँकेत तुम्ही खाते सुरू केल्यास तुम्हाला बँकेकडून दोन लाखांपर्यंतचा अपघाती विमा देखील मिळतो.
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)
ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेमध्ये ग्राहकांना झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर 2.7 टक्के व्याज देण्यात येते. बँकेत सेव्हिंग खाते ओपन केल्यास बँकेकडून मोफत डेबीट कार्डची सुविधा पुरवण्यात येते.
येस बँक (YES Bank)
एस बँकेमध्ये झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्यावर चार टक्के दराने व्याज देण्यात येते. मात्र या बँकेमध्ये ज्यांना मासिक पगार मिळतो किंवा जे नोकरदार आहेत. असेच लोक इथे खाते ओपन करू शकता. सेव्हिंग खात्यावर तुम्हाला बँकेकडून डेबिट कार्डची देखील सुविधा मिळते. तुम्ही एका दिवसात चाळीस हजारांपर्यंत रक्कम काढ़ू शकता.
संबंधित बातम्या
गुड न्यूज, इलेक्ट्रीक बाईकवर कर सवलतींचा पाऊस; इलेक्ट्रीक बाईकला सरकारी बॅकअप
Royal Enfield : जर तुमच्याकडेही असेल रॉयल एनफिल्डचं ‘हे’ व्हर्जन तर जाणून घ्या काय म्हटलं कंपनीनं?
Indian Railway : थंडीतही प्रवास होणार सुकर! रेल्वेनं सुरू केली ‘ही’ नवी सुविधा