Special Report | 2 हजार रूपयांची नोट बंद अन् वाद सुरू, आता १ हजार रूपयाची नोट येणार?

Special Report | 2 हजार रूपयांची नोट बंद अन् वाद सुरू, आता १ हजार रूपयाची नोट येणार?

| Updated on: May 23, 2023 | 7:06 AM

VIDEO | २ हजाराच्या नोटबंदीवरुन राजकारण पेटलं, उद्यापासून २ हजारांच्या नोटा बदलता येणार, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : २ हजारांची नोट ३० सप्टेंबरपर्यंत बँकेतून बदलून घेता येणार आहे. २ हजारांची नोटबंदी झाल्यानंतर आता १ हजारांची नोट येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर दूसरीकडे चर्चाही सुरू झाल्यात. मात्र आरबीआयने यासाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. तर नोटबंदीवरुन राजकारण देखील पेटल्याचं पाहायला मिळत आहे. देशाच्या चलनातील मोठी नोट अल्पायुशी ठरली. त्याच २ हजारांच्या नोटावरून आरोप-प्रत्यारोप सुरूये. काळा पैसा हटवण्याच्या उद्देशाने ५०० आणि १ हजाराची नोट बंदी केली होती. तिच गोष्ट २ हजाराच्या नोटेबाबत घडल्याची विरोधकांची टीका आहे. कारण जप्ती आणि निवडणुकांच्या काळात पडलेल्या छाप्यांमध्ये सर्वाधिक नोटा या २ हजार रूपयांच्याच होत्या. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदी लागू केली होती. त्यामुळे तेव्हाच्या ५०० आणि हजाराच्या नोटा बंद झाल्यात. चलनातील काळा पैसा हटवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. अंदाज असा होता की बहुतांश काळापैसा हा पाचशे आणि हजारांच्या नोटामध्ये आहे. त्यानंतर व्यवहारात पहिल्यांदाच २ हजाराची नोट व्यवहारात आणली गेली. पण आता अचानक २ हजाराची नोट व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय का घेतला, कोणी काय काय प्रतिक्रिया आरोप-प्रत्यारोप केलेत बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 23, 2023 07:06 AM