VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 15 January 2022
आशिष शेलार यांनी सलग चार ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार करत टोला लगावला आहे. गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का? गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का? 114% नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते?
आशिष शेलार यांनी सलग चार ट्विट करून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार करत टोला लगावला आहे. गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का? गेल्या 24 वर्षात 21 हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का? 114% नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते? मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात 22 हजार 500 कोटी खर्च करुनही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा? वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले? मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले? परीक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे? ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे?,असा सवाल शेलार यांनी केला आहे.
Latest Videos