VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 29 October 2021
आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक दोन नव्हे, तर तब्बल 34 हॉलतिकिटे आली आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यासमोर परीक्षा द्यायची कोठे? असा प्रश्न निर्माण झालाय.
आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक दोन नव्हे, तर तब्बल 34 हॉलतिकिटे आली आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यासमोर परीक्षा द्यायची कोठे? असा प्रश्न निर्माण झालाय. या निमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बीड तालुक्यातील शहाबाजपूर येथे राहणाऱ्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याने 20 ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यासाठी 630 रुपये शुल्कही भरले होते. यात त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती.
Latest Videos