VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 31 August 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अखेर त्यांना ठोठावण्यात आलेला 50 हजार रुपयांचा दंड भरला आहे. सिंग यांनी चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्रं सादर न केल्याने त्यांना हा दंड ठोठावण्यात आला होता. चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांना तीन वेळा दंड ठोठावला होता.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अखेर त्यांना ठोठावण्यात आलेला 50 हजार रुपयांचा दंड भरला आहे. सिंग यांनी चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्रं सादर न केल्याने त्यांना हा दंड ठोठावण्यात आला होता. चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांना तीन वेळा दंड ठोठावला होता. त्यानंतर आधी 5 हजार रुपये. नंतर 25 हजार रुपये आणि नंतर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानुसार सिंग यांनी अखेर ही रक्कम जमा केली आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
Latest Videos