VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 9 April 2022
शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संतापजनक प्रतिक्रिया नोंदवली. या आंदोलनाचा मास्टरमाइंड कोण आहे, हे लवकरच पोलीस शोधून काढतील. त्यानंतरच सूत्रधारांची नावं जाहीरपणे सांगता येतील. पण राज्य सरकारतर्फे आंदोलकांचे समाधान करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना आंदोलनात शिरून प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांना उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे.
शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संतापजनक प्रतिक्रिया नोंदवली. या आंदोलनाचा मास्टरमाइंड कोण आहे, हे लवकरच पोलीस शोधून काढतील. त्यानंतरच सूत्रधारांची नावं जाहीरपणे सांगता येतील. पण राज्य सरकारतर्फे आंदोलकांचे समाधान करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना आंदोलनात शिरून प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांना उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. एकिकडे गुलाल उधळता, कौतुकही करून घेता आणि नंतर मात्र इथपर्यंत टोकाचं वागण्याचा प्रयत्न करता, हे योग्य नाही. पोलीस यंत्रणा या सगळ्याचा अहवाल लवकरच सादर करेल, त्यानंतर कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
Latest Videos