VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 08 March 2022

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 08 March 2022

| Updated on: Mar 08, 2022 | 12:12 PM

ईडीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 13 पानांचं पुराव्यासह पत्रं दिलं आहे. अनेकांचा आग्रह आहे की ते पत्रं मीडियासमोर ठेवावं, देशासमोर ठेवावं. ते पत्रं आज मी तुम्हाला देईन. त्या पत्रावरून तुम्हाला कळेल की केंद्रीय तपास यंत्रणा किती भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत. कुणाच्या नियंत्रणाखाली काम करतात.

ईडीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 13 पानांचं पुराव्यासह पत्रं दिलं आहे. अनेकांचा आग्रह आहे की ते पत्रं मीडियासमोर ठेवावं, देशासमोर ठेवावं. ते पत्रं आज मी तुम्हाला देईन. त्या पत्रावरून तुम्हाला कळेल की केंद्रीय तपास यंत्रणा किती भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत. कुणाच्या नियंत्रणाखाली काम करतात. राजकीय विरोधकांची कोंडी करून त्यांना अडचणीत आणून या यंत्रणा भाजपच्या राजकारणाला हातभार लावतात. हे सर्व त्या पत्रात आहे. हे टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग बाहेर काढणार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.