VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 21 April 2022
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खाज ठाकरे म्हटलं. मिटकरी यांची ही टीका मनसेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट मिटकरींवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून. ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खाज ठाकरे म्हटलं. मिटकरी यांची ही टीका मनसेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट मिटकरींवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून. ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेव्हा चड्डीत राहायचं काय समजलं?, अशी दमबाजीच संदीप देशपांडे यांनी केली आहे. देशपांडे यांनी ट्विट करून ही दमबाजी केली आहे. त्यामुळे देशपांडे यांच्या या टीकेला मिटकरी काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अमोल मिटकरी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड आक्रमक झाले आहेत. भाजपवर टीका करतानाच त्यांनी मनसेवरही जबरदस्त तोंडसुख घेतलं आहे.
Latest Videos