VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 27 March 2022
मुक्ताई मंदिरातील 5 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पाटील बरसले. एकनाथ खडसेंकडून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा घणाघात जळगावातील मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. मुक्ताई मंदिरातील 5 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पाटील बरसले. एकनाथ खडसेंकडून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. तर मुक्ताईनगर, संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवावे असे आव्हान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
Latest Videos