‘माझा विनायक मेटे करण्याचा डाव’, ‘या’ काँग्रेस नेत्यानं केला खळबळजनक दावा
VIDEO | लोकांची मनं जिंकता येत नाही म्हणून काही लोकांचा असा कार्यक्रम सुरू आहे, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा, बघा व्हिडीओ
नांदेड : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहेत. ‘माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे. तर माझ्यावर सतत एका अज्ञात व्यक्तीकडून पाळत ठेवली जात आहे. मी जिथे जिथे जाईन, तिथे मागे येते. मुंबई आणि नांदेडमध्ये आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जाते आहे. इतकेच नाहीतर ही व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करीत असल्याचे दिसून येते. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असा संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी नांदेड पोलिसांत रितसर तक्रार दाखल केल्याचे दुपारी ट्वीट करून सांगितले होते. बघा काय केला अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे खळबळजनक दावा.