अरविंद सावंत यांचा शिंदे सरकारवर निशाणा
"आरोपींची नावं दिली असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट ज्यांना मार लागला, त्यांच्यावरच कारवाई होतेय. या सर्व गोष्टींबद्दल आम्ही पोलीस महासंचालकांना निवेदन दिलंय", अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
“माथेरानच्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर निर्घृण हल्ला झाला. त्याचे आरोपी अजूनही पकडले गेले नाहीत. प्रसाद सावंत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यांना अजूनही जीवघेण्या धमक्या येत आहेत. आरोपींची नावं दिली असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट ज्यांना मार लागला, त्यांच्यावरच कारवाई होतेय. या सर्व गोष्टींबद्दल आम्ही पोलीस महासंचालकांना निवेदन दिलंय. कायदा सर्वांना सारखा असायला हवा. हीच मागणी आम्ही रजनीश यांच्याकडे केली आहे”, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
Published on: Aug 04, 2022 02:57 PM
Latest Videos