Beed Parli Election Result 2024 : परळीत कोणाच्या ‘घड्याळ्या’ची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादी vs राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा? आघाडीवर कोण?

| Updated on: Nov 23, 2024 | 10:18 AM

Parali Vidhan Sabha Election Results 2024 : गेल्या निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांचा लीड मिळाला होता. आता धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट चुरशीची लढत होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

परळी मतदारसंघाची आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघाच्या निकालाचे साधारण दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळत आहे. महायुतीत ही परळी विधानसभेची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली. त्यामुळे महायुतीतून धनंजय मुंडे यांना विधानसभेची उमेदावारी येथून देण्यात आली. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांची या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांचा लीड मिळाला होता. आता धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट चुरशीची लढत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येईल. मात्र सध्या त्यांना 9000 मतांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या फेरी अखेर धनंजय मुंडेंना 9 हजार 116 मतांची आघाडी होती तर चौथ्या फेरी अखेरीस 15 हजार 992 मतांची आघाडी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Nov 23, 2024 10:12 AM
Kopri-Pachpakhadi Election Result 2024 : कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की…?
Assembly Election Result 2024 : मलिक बाप-लेक दोघंही पिछाडीवर, अणूशक्तीनगर अन् मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?