Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 ते 12 वर्षाच्या मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय

6 ते 12 वर्षाच्या मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय

| Updated on: Apr 26, 2022 | 3:08 PM

कोरोनाच्या (Corona 4th Wave) संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी हाती आली आहे. आता वयवर्ष सहा ते बारा (Vaccine for children’s) या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या (Corona 4th Wave) संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी हाती आली आहे. आता वयवर्ष सहा ते बारा (Vaccine for children’s) या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता सहा ते बारा वर्षांच्या मुलाला कोवॅक्सिन (Covaxin) लसीचा डोस देण्यात येईल. कोरोनाच्या लाटेत आतापर्यंत तरी लहान मुलांवर फारसा परिणाम जाणवला नव्हता. मात्र आता कोरोनाच्या नव्या एक्सई या वेरीएन्टमुळे अनेक चिमुरड्यांना संसर्ग होत असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे.