“राऊतांचा भोगा बंद करण्यासाठीच ईडीचं कटकारस्थान सुरु”, सुनिल राऊतांचा आरोप
आम्ही नियमानुसार व्यवहार केला असूनही काहीतरी कारण काढून संजय राऊतांना अडकवलं जात आहे. त्यासाठीच त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असल्याचा आरोप सुनिल राऊत यांनी केलाय.
मुंबईः ईडीच्या (ED) विशेष कोर्टानं काल संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ केली. 8 ऑगस्ट पर्यंत संजय राऊतांना कोठडी देण्यात आली आहे. भाजपतर्फे शिवसेनेविरोधात सूडाचं राजकारण केलं जातंय. लोक हजारो कोटी रुपये घेऊन फरार होतात, पण त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. आम्ही नियमानुसार व्यवहार केला असूनही काहीतरी कारण काढून संजय राऊतांना अडकवलं जात आहे. त्यासाठीच त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली असल्याचा आरोप सुनिल राऊत यांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळेच एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रिपद मिळालं. मात्र आता राऊतांचा भोंगा बंद करण्यासाठीच त्यांच्याविरोधात ईडीचं कटकारस्थान सुरु असल्याचा आरोप बंधू सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी केलाय. आज सुनिल राऊत यांनी पत्रकारांसमोर प्रतिक्रिया दिली.
Published on: Aug 05, 2022 11:54 AM
Latest Videos