VIDEO : Fast News | 1:30 PM | महत्त्वाच्या घडामोडी | 17 जून 2021
राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. देशमुख यांनी तसे संकेतही दिल्याने भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राज्याचे माजी अर्थराज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. देशमुख यांनी तसे संकेतही दिल्याने भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर देशमुख यांच्या पक्षप्रवेशाने विदर्भात ताकद वाढवण्यात काँग्रेसला बळ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुनील देशमुख हे विदर्भातील मोठे नेते आहेत. त्यांचा विदर्भातील काही पट्ट्यांमध्ये दबदबा आहे. तसेच कुशल संघटक आणि लोकप्रिय नेते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. भाजपने 2014मध्ये भाजपने विदर्भाच्या भरवश्यावर राज्यात सरकार स्थापन केलं होतं.
Published on: Jun 17, 2021 02:07 PM
Latest Videos