VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 1:30 PM | 28 June 2021
वाशिममध्ये सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत बाजारपेठा सुरू राहणार आहेत. महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.
वाशिममध्ये सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत बाजारपेठा सुरू राहणार आहेत. महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. या दरम्यान अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुपारी चारनंतर इतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता वाशिममध्येही सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत बाजारपेठा सुरू राहणार आहेत.
Latest Videos