VIDEO : मुंबै बँक कर्ज घोटाळा प्रकरणी सरकारने चौकशी करावी : Suresh Das
भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यामागे पुन्हा एकदा मुंबै बँक घोटाळ्याचा ससेमिरा लागला आहे. या प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी होणार आहे. त्यामुळे दरेकर आणि सुरेश धस यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. आता यासर्व प्रकरणी सरकारने चौकशी करावी अशी मागणीच आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यामागे पुन्हा एकदा मुंबै बँक घोटाळ्याचा ससेमिरा लागला आहे. या प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी होणार आहे. त्यामुळे दरेकर आणि सुरेश धस यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे. आता यासर्व प्रकरणी सरकारने चौकशी करावी अशी मागणीच आमदार सुरेश धस यांनी केली आहे. मुंबै बँकेच्या मुंबईतील ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झाली आहे. हे कर्ज वाटप करताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण दरेकर हे त्यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे.
Latest Videos