AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | रॉयल एन्ट्री ! नवरदेवाचा रुबाब, नवरीचा थाट; लग्न मंडपात केला असा प्रवेश, व्हिडीओ पाहाच

सध्या मात्र अशाच एका नव्या जोडीचे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे. लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या भावी नवरी-नवरदेवाने लग्नमंडपात भन्नाट एन्ट्री केली आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

Video | रॉयल एन्ट्री ! नवरदेवाचा रुबाब, नवरीचा थाट; लग्न मंडपात केला असा प्रवेश, व्हिडीओ पाहाच
GROOM AND BRIDE VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 10:46 AM
Share

मुंबई : लग्नाचा दिवस हा कायमस्वरुपी स्मरणात राहावा अशी इच्छा प्रत्येक वधू आणि वराची असते. या अविस्मरणीय क्षणाला यादगार करण्यासाठी काही जोड्या तर प्रचंड मेहनत घेतात. नाविण्यपूर्ण कल्पनांच्या मदतीने काही जोडप्यांचे लग्न चर्चेलादेखील येते. सध्या मात्र अशाच एका नव्या जोडीचे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे. लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या भावी नवरी-नवरदेवाने लग्नमंडपात भन्नाट एन्ट्री केली आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

नवरी-नवरदेव घोड्यावर बसून आले 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. हा व्हिडीओ लग्नमंडपातील असून नवरी आणि नवरदेव दोन वेगवेगळ्या घोड्यांवर बसलेले दिसत आहेत. नवरी-नवरदेव नटून थटून आल्यामुळे दोघेही सर्वांच्याच नजरेत भरावेत असे रुबाबदार दिसतायत. दोन वेगवेगळ्या घोड्यांवर बसून ते मंडपात प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे हे सारं करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसतोय. सुरुवातीला नवरी आणि नवरदेवाने एकमेकांचा हात पकडलेला आहे. तर दुसरीकडे त्यांचे नातेवाईक या नव्या जोडीचे फोटो काढण्यात दंग झालेले बघायला मिळतायत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हिडीओ सोशल मीडिायवर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. तसेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअरही करत आहेत. आजकालची नवरी खूप सुंदर दिसते. अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने केली आहे. तर माझ्यासाठी ही सर्वात बेस्ट एन्ट्री होती, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. तर अशी नवरी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही, असं आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘thebridesofindia’ या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Viral Video | राहत्या घरात तरुणीचा थरारक स्टंट, केलं असं काही की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मध्य प्रदेश पोलिसांचा अजब कायदा, लांब मिशा ठेवल्या म्हणून हवालदाराचे निलंबन, सोशल मीडियावर एकच चर्चा

Viral : माकडाची फुग्यांसोबत मस्ती, Video पाहून अनेकांना आठवलं त्यांचं बालपण

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.