Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’नो डिसेंबर महिन्याचा हप्ता हवाय? अर्ज भरताना ‘ही’ कागदपत्रं तुम्ही जोडलीत का?

| Updated on: Dec 11, 2024 | 12:23 PM

विधानसभेला पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास 1500 रूपयांचे 2100 रूपये करणार असं आश्वासन सरकारने केलं होतं. मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना केलेल्या अर्जाची छाननी होणार असून लाडक्या बहिणीच्या निकषावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. अशातच विधानसभेला पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास 1500 रूपयांचे 2100 रूपये करणार असं आश्वासन सरकारने केलं होतं. मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना केलेल्या अर्जाची छाननी होणार असून लाडक्या बहिणीच्या निकषावरून पुन्हा चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काल माजी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या अर्जांची कोणतीही छाननी होणार नसल्याचे स्पष्ट केले असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यापूर्वी सरकारकडून काही कागदपत्र आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, महायुती सरकारच्या या नव्या निकषानंतर पुणे आणि सोलापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत दोन कोटी ३४ लाख महिलांना लाभ मिळाला आहे.

Published on: Dec 11, 2024 12:23 PM