अजित पवार मुख्यमंत्री होणार, दिल्लीतून सूत्र हलली; राष्ट्रवादीच्या नेत्याने स्पष्ट केल्या हालचाली
अजित पवार यांच्यासारखा तोलामोलाचा नेता महाराष्ट्राचा राजकारण सांभाळेल असा सध्या तरी महाराष्ट्रात कोणी नाही. हे दस्तुरखुद्द अमित शहा यांनी कबूल केल आहे.
बीड : विरोधी पक्ष नेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना आहे. तर जसे हे राज्य व्हावं अशी श्रींची ईच्छा होती तशीच या राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत अशी कार्यकर्ते म्हणून सर्वांची भावना असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तर एकंदरीत प्रशासनावर पकड असणारा, अभ्यासू व्यक्तीमत्व हे राज्याचं मुख्यमंत्री पदावर असावं असं प्रत्येकाला वाटतं. तशीच आपली भावना आहे. त्यातूनच धाराशीव, नागपूर येथे त्यांचे बँनर लागले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: बँनर हटवण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे अजित पवार यांच्यासारखा तोलामोलाचा नेता महाराष्ट्राचा राजकारण सांभाळेल असा सध्या तरी महाराष्ट्रात कोणी नाही. हे दस्तुरखुद्द अमित शहा यांनी कबूल केल आहे. त्यामुळे अजित दादा हे मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच. दिल्लीतून सूत्र हलली आहेत. अजित पवार हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री दिसतील. एकनाथ शिंदे तर आता सक्तीच्या रजेवर गेलेत. मात्र त्याचा आणि याचा काही संबंध नाही असेही मिटकरी म्हणाले.