VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 8 March 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12.30 PM | 8 March 2022

| Updated on: Mar 08, 2022 | 1:26 PM

शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने तीन दिवस छापेमारी केली. त्यानंतर आयकर विभागाने आज पुन्हा एकदा धाडसत्रं सुरू केलं आहे. आयकर विभागाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राहुल कनाल आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरावर छापेमारी केली आहे. कनाल हे युवा सेनेत पदाधिकारी आहेत. तर संजय कदम हे स्थानिक शिवसैनिक आहेत.

शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने तीन दिवस छापेमारी केली. त्यानंतर आयकर विभागाने आज पुन्हा एकदा धाडसत्रं सुरू केलं आहे. आयकर विभागाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राहुल कनाल आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरावर छापेमारी केली आहे. कनाल हे युवा सेनेत पदाधिकारी आहेत. तर संजय कदम हे स्थानिक शिवसैनिक आहेत. तसेच आयकर विभागाने पुण्यात आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरीही छापेमारी केल्याचं वृत्त आहे. सकाळपासूनच आयकर विभागाने ही छापेमारी सुरू केली आहेत. विशेष म्हणजे कनाल आणि कदम ही दोन्ही नावे कधीच चर्चेत नव्हती. या दोघांवरही आयकर विभागाची वक्रदृष्टी फिरल्याने शिवसेनेचे धाबे दणाणले असून या कारवायांमुळे शिवसेनेची कोंडी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.