VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 16 September 2021
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्र लिहिलं आहे. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटींचा ठेका कुणासाठी?, असा सवाल त्यांनी महापौरांना पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पत्र लिहिलं आहे. वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटींचा ठेका कुणासाठी?, असा सवाल त्यांनी महापौरांना पत्राच्या माध्यमातून विचारला आहे. “आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केलीये, हे अत्यंत निंदनीय आहे” राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका ‘पेंग्वीन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले.” असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
Latest Videos