I.N.D.I.A आघाडीचा मंत्री उदय सामंत यांनी थेट सांगितला फुलफॉर्म, Watch Video

I.N.D.I.A आघाडीचा मंत्री उदय सामंत यांनी थेट सांगितला फुलफॉर्म, Watch Video

| Updated on: Aug 31, 2023 | 6:55 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नावाची वेगळीच फोड करुन विरोधकांवर केली सडकून टीका, बघा काय सांगितला नवा फुलफॉर्म?

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ | विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या मोठी आणि महत्त्वाची बैठक होत आहे. अशातच सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या या बैठकीवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नावाची वेगळीच फोड करुन विरोधकांवर केली सडकून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नावाची वेगळीच फोड करुन त्याचा थेट फूल फॉर्म पत्रकार परिषदेत सांगून विरोधकांवर निशाणा साधला आहे. “खासदारकीची निवडणूक झाली की, I चा अर्थ इंडियन काँग्रेस फुल स्टॉप, N म्हणजे जी NCP त्यांच्याबरोबर आहे ती फुलस्टॉप, D म्हणजे DMK फुलस्टॉप, I म्हणजे इंडियन मुस्लिम लीग फुलस्टॉप, A म्हणजे आप आणि अन्य असलेले सगळे फुलस्टॉप. देशाच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग करणं या एवढं दुर्दैवं नाही”, असं उदय सामंत म्हणाले.

Published on: Aug 31, 2023 06:55 PM