शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याचं मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत, म्हणाले…

| Updated on: Aug 25, 2023 | 4:36 PM

VIDEO | शरद पवार यांनी केलेल्या अजित पवार यांच्याबाबतच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया केली व्यक्त, काय म्हणाले?

नाशिक, २५ ऑगस्ट २०२३ | शरद पवार यांनी केलेल्या अजित पवार यांच्याबाबतच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, आमचीही तिच भूमिका आहे. जसे शरद पवार म्हणाले, अजित पवार हे आमचे नेते आहेत. तसेच छगन भुजबळ आणि मुंडे हे सुद्धा तुमचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचं आम्ही स्वागत करतो आणि आम्हाला आनंद वाटतो. आम्हीही तेच म्हणतोय. म्हणून आम्ही शरद पवार यांना भेटलो होतो. आमच्यात फूट नाही, फक्त एक गट सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे आम्हाला एवढंच वाटतं की त्या कृतीला, तुम्हीही समर्थन असं सांगतानाच आम्ही पक्ष सोडलेला नाही. आमची निशाणी घड्याळच आहे. आमचा झेंडा तोच आहे, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Published on: Aug 25, 2023 04:36 PM
अजित पवार यांना शरद पवार राष्ट्रवादीमध्ये पुन्हा संधी देणार? काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…