Pankaja Munde | ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर

Pankaja Munde | ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर

| Updated on: Sep 02, 2021 | 8:47 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्यात.

भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्यात. पंकजा मुंडे यांच्या या पोस्टनंतर लक्ष्मण खेडकर नावाच्या एका व्यक्तीनंही एक फेसबुक पोस्ट केली. यामध्ये त्याने पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजुरांच्या नेत्या या नात्याने ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजुरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का? तेही जरा पाहा. त्यावर पंकजा यांनी देखील सविस्तर उत्तर दिलं.