ज्यादिवशी राजकीय भूमिका घेईन, त्यादिवशी सिनेक्षेत्रातील काम बंद करेन- प्रवीण तरडे

ज्यादिवशी राजकीय भूमिका घेईन, त्यादिवशी सिनेक्षेत्रातील काम बंद करेन- प्रवीण तरडे

| Updated on: May 31, 2022 | 2:17 PM

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना कलाकाराने राजकीय भूमिका घ्यावी की नाही, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी आपलं ठाम मत मांडलं. कुठल्यात अभिनेत्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये, असं ते म्हणाले.

कुठल्याही अभिनेत्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये, असं ठाम मत अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मांडलं. “अभिनेता हा सर्वांचा असतो. त्याचा सिनेमा बघायला केवळ विशिष्ट लोक येत नाहीत. कलाकृती ही समाजाची आहे. समाजाचं देणं फेडण्यासाठी आपण करतो. त्यामुळे कलाकार हा जास्तीत जास्त समाजाचं देणं असू शकतो. समाजाने त्याला वाटेल ते प्रश्न करावेत आणि त्याने समाजाचं प्रतिनिधित्व करावं. या मताचा मी 100 टक्के आहे. त्यामुळे प्रवीण तरडे तुम्हाला कधीची कोणत्याही राजकीय व्यासपीठावर त्यांची बाजू घेताना दिसणार नाही. ज्यादिवशी ते करेन, त्यादिवशी हे क्षेत्र बंद करेन. या क्षेत्राचा वापर तिथे जाण्यासाठी करायचा नाही आणि तिथला वापर इकडे नाही करायचा,” असं ते म्हणाले.

Published on: May 31, 2022 02:17 PM