MSRTC : 'लालपरी'वर अयोध्या अन् प्रभू श्रीराम दिसणार?, कुणी केली मागणी?

MSRTC : ‘लालपरी’वर अयोध्या अन् प्रभू श्रीराम दिसणार?, कुणी केली मागणी?

| Updated on: Jan 05, 2024 | 12:47 PM

येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरातील रामाची प्राणप्रतिष्ठा आणि प्रभू रामाच्या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येत दिवस रात्र एक करून जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बसवर अयोध्या आणि प्रभू श्रीरामचंद्र यांचं चित्र लावा, अशी मागणी कऱण्यात आली आहे.

मुंबई, ५ जानेवारी २०२४ : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा आणि प्रभू रामाच्या मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी समस्त हिंदू उत्सुक असून या दिवसाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत दिवस रात्र एक करून जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रत्येक बसवर अयोध्या आणि प्रभू श्रीरामचंद्र यांचं चित्र लावा, अशी मागणी एस टी कष्टकरी जनसंघचे संस्थापक अध्यक्ष वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी आज शिष्टमंडळ, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेतली. लालपरीवर प्रभू रामचंद्र यांचं चित्र लावण्याच्या मागणीसह एसटी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर या सर्व मागण्यावर आम्ही कायदेशीर, सकारात्मक विचार करून योग्य पाऊलं उचलणार असल्याचे आश्वासन एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी शिष्टमंडळाला दिला आहे.

Published on: Jan 05, 2024 12:43 PM